Skip to main content

Posts

पावसाच्या नक्षत्रांचे वर्णन

गावाकडे पावसाच्या नक्षत्रांचे बोलकं वर्णन केलं जातं. त्याच भाषेत सांगायचं झालं तर तरणा पाऊस पडून गेलाय, त्याच्या पाठोपाठ म्हाताराही पडून गेला आहे. आता सासूचा पाऊस पडेल मग सुनेचा पाऊस पडेल. हे असं का म्हटलं गेलंय याचे बहुतेक निष्कर्ष खुमासदार आहेत.  बहुधा प्रत्येक पाऊसनक्षत्रासाठी गावाकडे स्वतंत्र म्हणी आहेत.  पडतील स्वाती तर पिकतील माणिक मोती (स्वाती नक्षत्रातला पाऊस पिकाला खर्‍या अर्थाने उभारी देतो, रूपरंग देतो. त्यामुळे या नक्षत्रात पाऊस झाला तर खर्‍या अर्थाने माणिक मोती पिकतात) पडतील चित्रा तर भात खाईना कुत्रा (चित्रा नक्षत्रातला पाऊस बिनभरवशाचा असतो. पडला तर इतका पाऊस पडतो की तो काहीच शिल्लक ठेवत नाही, अगदी वाडग्यात काढून ठेवलेलं उष्टावण असो की ताजं जेवण असो ते एकतर सादळून तरी जातं नाहीतर बेचव तरी होऊन जातं. म्हणून मग त्याची चव जाते. मग त्याचं वर्णन भात खाईना कुत्रा अशा शेलक्या शब्दात आलंय)           ,  पडतील आर्द्रा तर झडतील गडदरा (आर्द्रा नक्षत्रातला पाऊस बरसला तर गडकोटांच्या तटबंदी ढासळतील. काही खेड्यात गरदाडा असा ही शब्द आढळतो. त्याचा अर्थ खबदाड, भागदाड असा होतो. म्हणजे काय तर
Recent posts

निवेदकाचे / गोष्ट सांगणार्याचे सहा गुण

माधुर्यम् अक्षरव्यक्ती: पदच्छेद: तु सुस्वर: ।  धैर्यम् लयसामर्थ्यम् च षडेते पाठका गुणा: । भाषेचा गोडवा, अक्षरांचे उच्चारण, शब्दांचा योग्य तो पदच्छेद - (योग्य ठिकाणी शब्द तोडणे, pause घेणे, जोर देणे वगैरे), सुस्वर - आवाजाचा गोडवा ,  धैर्य - धीटपणा / आत्मविश्वास, आणि लयसामर्थ्य  - योग्य तो आवाजाचा चढ उतार आणि लय (monotonous नसणे), हे पाठकाचे - म्हणजे निवेदकाचे / गोष्ट सांगणार्याचे सहा गुण असतात / असावेत.  मदन 

UNIQUE VILLAGES IN INDIA

*● UNIQUE VILLAGES IN INDIA* *● गांवांचा वेगळेपणा ......* *१)• शनिशिंगणापूर (महाराष्ट्र)*     संपूर्ण गांवात, एकाही घराला कडी-कोयंडा नाही.     गांवात पोलीस चौकी,पोलीस ठाणे नाही.     गांवात चो-या नाहीत. *२)• शेटफळ (महाराष्ट्र*)     प्रत्येक ग्रामस्थाच्या घरात, कुटुंबाचा सदस्य      असल्यासारखी सर्पराजाची उपस्थिती. *३)• हिवरे बाजार (महाराष्ट्र*)     भारतातील सर्वात "श्रीमंत" खेडे.      ६० अब्जाधीश घरे. एकही "गरीब" नाही.     सर्वाधिक GDP असणारं खेडं. *४)• पनसरी (गुजरात)*     भारतातील सर्वात "अत्याधुनिक" खेडेगांव.     गावातील सर्व घरात CCTV जोडण्या असून,     Wi-Fi सुविधाही आहेत.     गांवातील सर्व 'पथदीप' सौरउर्जेवर चालतात. *५)• जंबुर (गुजरात)*     भारतीय वंशाचे असूनही, सर्व नागरिक     "आफ्रिकन" वाटतात.     [परिसरात आफ्रिकन गांव अशीच ओळख] *६)• कुलधारा (राजस्थान)*     "अनिवासी" गांव. गांवात कोणीही रहात नाही.      घरे बेवारस सोडलेली आहेत. *७)• कोडिन्ही (केरळ*)      जुळ्यांचे गांव. जवळपास प्रत्येक घरात जुळं. *८)• मत्तूर (कर्नाटक*)     दै

विडा किंवा तांबूल महत्व व संबंधित कथा.

विडा किंवा तांबूल महत्व व संबंधित कथा.... ---------------- १ )तांबूल प्रदान : देवीला विडा हा आत्यंतिक प्रिय आहे. विडा हा ही रजोगुणी आहे. त्रयोदशगुणी विडा तिला आत्यंतिक प्रिय आहे. जगाच्या कल्याणासाठी तिला सत्त्वगुणापेक्षाही रजोगुणाची आवश्यकता असते. म्हणून तिला रजोगुणी पदार्थ सेवन करण्याची आवड आहे. विडा, तिला प्रिय आहेत. -------------------------  २)तांबूल ऊर्फ विडा  ‘विडा’सुद्धा सर्व थरांतल्या लोकांमध्ये प्रिय आहे.   तांबूल म्हणजे कात , चुना, सुपारी इत्यादी पदार्थ घालून केलेला नागवेलीच्या पानाचा विडा. हा त्रयोदशगुणी असावा असा संकेत आहे. ते तेरा गुण म्हणजे तिखटसर, कडवट, उष्ण, मधुर, खारट व तुरट, वातहारक, कृमिनाशक, कफहारक, दुर्गंधी नाहीशी करणारा, मुखाची अशुध्दी नाहीशी करून मुखाला शोभा आणणारा, कामाग्नी उद्दीपीत करणारा...  ‘योगरत्नाकर’ ह्या ग्रंथातील एका श्लोकामध्ये हे सर्व वर्णन दिले आहे. त्यात विड्याचे घटक म्हणून पदार्थ दिले आहेत, नागवेलीची पाने, सुपारी, कात , चुना , कापूर , कस्तुरी, लवंग , जायफळ व तंबाखू . तंबाखूमुळे दंतरोग शमन होतो, तसेच कृमी व कंड नाश पावतात.   विडा खाण्याची प्रथा भारता

वनस्पतींची निसर्गऊर्जा

वनस्पतींची निसर्गऊर्जा -                                                              रानात भटकायला गेल्यावर अमक्याला ‘चकवा’ लागला किंवा ‘बाहेरची बाधा’ झाली, अशा गोष्टी कुणाकुणाकडून  ऐकायला मिळतात. वनस्पती अभ्यासकांच्या मते या ‘चकव्या’लाही वनस्पतीशास्त्रात काही आधार आहे. त्याचा संबंध भुताखेताशी नसून ठरावीक वनस्पतींचं स्वयंसंरक्षणासाठीचं ते एक शस्त्र आहे. नुकत्याच झालेल्या पर्यावरण दिनाच्या (५ जून) निमित्तानं..जंगलातल्या काही जागा मंगल वाटतात. केवढं प्रसन्न आणि रमणीय वाटतं तिथे. याचा अर्थ तिथे सकारात्मक ऊर्जेचे प्रवाह वाहत असतात. तर काही जागा गूढ, रहस्यमय शक्तींनी भारलेल्या असतात असं वाटतं, आणि त्या आपल्याला अस्वस्थ करतात. तिथे नकारात्मक ऊर्जेचं प्राबल्य असतं. त्या ऊर्जेच्या संपर्कात माणूस आला, की माणसाचं संतुलन बिघडतं. तो भारलेल्या अवस्थेत जातो. कधी आजारीही पडतो. अशी भारून टाकणारी एक अरण्यशक्ती तिथे असते. या अरण्यशक्तीचे, निसर्गऊर्जेचे अनेक अनुभव, अरण्य हेच आपलं घर मानून, सारं जीवन अरण्यात घालवणाऱ्यांना येतात. रानावनात पडणारा चकवा किंवा पडणारी ‘रानभूल’ म्हणजे पानाफुलांतील, वृक्षवेलींती

शोध बाजीराव-मस्तानीपुत्र, पानिपतवीर समशेर बहादूर यांच्या कबरीचा

*शोध बाजीराव-मस्तानीपुत्र, पानिपतवीर समशेर बहादूर यांच्या कबरीचा*     पानिपत!हिंदुस्थानच्या रक्षणासाठी लाखभर मराठ्यांनी प्राणाहुती दिलेले स्थान! मध्ययुगीन भारतातील सर्वात मोठे युध्द,महायुद्धच! मराठ्यांच्या प्रखर राष्ट्रीय भावनेचा धगधगता अविष्कार! मराठ्यांनी हारूनही जिंकलेले युध्द!       या प्रचंड रणसंग्रामात अनेक प्रसिद्ध, अप्रसिद्ध मराठी सरदारांच्या, वीरांच्या समवेत लढले होते पेशवे बाजीराव आणि मस्तानी यांचे पुत्र समशेर बहादूर. प्राणांतिक जखमांनी घायाळ झालेल्या समशेर बहादूरांनी अखेरचा श्वास घेतला तो भरतपूरमधे.याच समशेर बहादूरांच्या कबरीचा शोध मला कसा लागला त्याची हकीकत या लेखात नमूद करीत आहे.      महाराष्ट्रातील आणि इतरही राज्यातील शिवरायांचे किल्ले पाहण्याच्या प्राथमिक उद्देशाने  १९९० मधे सुरु झालेली माझी दुर्गदर्शन यात्रा पुढे खूप विस्तारत गेली.इतिहास घडविणाऱ्या मराठी वीरांच्या समाधीस्थळांचे दर्शन आणि शोध हा महत्वाचा विषय या यात्रेत समाविष्ट झाला.२००६ पर्यंत जवळपास तीनशे किल्ले पाहिले आणि शंभराहून अधिक महत्वाच्या मराठी वीरांच्या समाधीस्थळांचे दर्शन घडले.यातील बहुतांश समाधीस्थळे २००६

मधुमालती

#मधुमालती 🌸🌿🌸🌿 नावातच मधु असलेली आणि उसाच्या पेरांपेरांत साखर भरलेली असते तशी देठादेठांत मध भरलेली ही मालतीची फुलं आपल्यालाच काय तर काळ्या मुंग्यांनाही माहित असतात.😁त्याशिवाय का त्या दिवसभर फुलांच्या आत बाहेर करत मध गोळा करतात?😛म्हणजे नावात काय आहे असं विचारणा-यांनाही कळेल की मधुमालतीची वेल आणि तिच्यावर येणारी फुलं हे प्रकरण किती गोड आहे ते !☺ही मधु आणि मालतीची जोडी पूर्वी लग्नात नाव ठेवतानाही आढळायची.म्हणजे नव-याचं नाव मधुकर किंवा मधुसूदन असेल तर बायकोचं नाव बदलताना त्याला हमखास मालतीच सुचवलं जायचं 😜 इतकी ही जोडी फेमस होती.मी पाचवीत रोह्याला असताना बाबांच्या एका मित्राकडे जाऊन "मधुकाका...उद्या संध्याकाळी आमच्या घरी हळदीकु़ंकवाला मालतीकाकूंना पाठवा" असं बेधडक निमंत्रण दिलं होतं.मग काकांनी हसत हसत सांगितलं की नक्की पाठवतो पण काकूचं नाव मोहिनी आहे ! 🙈म्हणजे तिथे नियमाला अपवाद होता.🤗हिचं नावच इतकं गोड आहे की सिंहासन बत्तिशी लिहितानाही नवव्या पुतळीचं नाव मधुमालती ठेवण्याचा मोह लेखकाला आवरता आला नाही ! तर अशी ही मधुमालती ही भारतीय वंशाची सदाहरित वेलवर्गीय वनस्पती.#कॉम्ब्र