Skip to main content

Posts

Showing posts from March 13, 2017

Holi Celebrations

11/03/17, 6:35 PM - Messages you send to this group are now secured with end-to-end encryption. Tap for more info. 12/03/17, 4:34 AM - Shubhabgi Lele Kolhi SHS: पुरणपोळी ही भैरवीसारखी आहे. किमानपक्षी सूर नीट लागले तरी भैरवी कमीअधिक रंगतेच. तसंच पुरण छान जमलं की पुरणपोळीची वैगुण्यं क्षम्य आहेत ! पुरणपोळीसाठी केलेले श्रम ही एक संपूर्ण मैफल आहे तर ती खाणे म्हणजे भैरवी आहे. रांधणे हा (जाणकारांसाठीच) आनंद आहे आणि भोजन हा परमानंदाचा कळस आहे. डाळ निवडून घेणे इ. भूप, किंवा बिलावल आहेत. जास्त कसब गरजेचं नाही. कणिक मळणे हा खमाज आहे. रटाळ तरी थाटाचा असल्याने गरजेचा ! गूळ म्हणजे यमन! यमन हा रागांचा राजा तसंच गुळाचं महत्व! इथं तीव्र मध्यम श्रुतीमनोहरच लागायला हवा म्हणजेच गुळाचा हात नेमकाच पडायला हवा (अन्यथा बट्ट्याबोळ!). हां, आता ज्यांना जमत व गमतं ('प्रभू आजि गमला' या अर्थाने) नाही ते दोन्ही मध्यम घेऊन त्याचा यमनकल्याण करतात म्हणजेच गुळात साखरही मिसळतात. जायफळाची एखादी ठुमरी झाली की लगेच पुरण शिजवायचं ते अगदी देस रागाप्रमाणे. 'गनिसा' ही संगती देस ची ओळख (सिग्नेचर) तसंच, रटरट आवाजाब...