Skip to main content

Posts

Showing posts from May 10, 2017

लोणार एक रहस्य

लोणार एक रहस्य...  बुलढाणा जिल्ह्यातील लोणार विवर हे जागतिक आश्चर्य आहे. लोणार विवर एका अशनी च्या पृथ्वीवर आदळण्याने तयार झाले आहे. उल्का आणि अशनी मधील सगळ्यात मोठा फरक बघायचा तर लोणार ला भेट द्यावीच. प्रत्येक वर्षी १५,००० टन वजनाच्या उल्का पृथ्वीच्या वातावरण प्रवेश करतात. पण पृथ्वीच्या वातावरणात जळून नष्ट होतात. पण अनेक हजार वर्षात ह्या उल्कांचे अशनी मात्र लोणार सारखा एखादाच होतो. उल्का जेव्हा पृथ्वीवर आदळते तेव्हा त्याला अशनी अस म्हणतात. जवळपास ५२,००० वर्षापूर्वी असाच एक अंदाजे ६० मीटर जाडीचा आणि १०,००० टन वजनी अशनी लोणार इकडे पृथ्वीला धडकला. ह्या धडकण्याने जवळपास अंदाजे ६ मेगा टन शक्तीचा स्फोट झाला. आपल्याला ज्ञात असलेल्या हिरोशिमा-नागासाकी इथली शक्ती ०.२५ मेगा टन इतकीच होती. म्हणजे लोणार इथली धडक पूर्ण भूतलावर त्यावेळी जाणवली असेल असा शास्त्रज्ञाचा होरा आहे. इतक्या प्रचंड टक्करीमुळे पृथ्वी सुद्धा आपल्या व्यासात हलली असेल. अस सुद्धा काही शास्त्रज्ञ सांगतात.  इतक्या प्रचंड ऊर्जेमुळे १.८ किलोमीटर व्यासाच तसेच १३७ मीटर खोलीच एक विवर तयार झाल. ह्या टक्करी मधून झालेल्या उर्जेमुळे इथल ताप...

*नांदत्या घराची किंमत ....*

*नांदत्या घराची किंमत ....* ....दोन दिवसापूर्वी मी एका कंपनीचा सामाजिक उपक्रम म्हणून  मेळावा आयोजित केला होता तो एका वृद्धाश्रमात.  त्या कार्यक्रमाचे फोटो दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळीच पेनड्राईव्ह मध्ये पाठवतो असे व्यवस्थापकांनी सांगितले. वाटलं ..कोणी ऑफिसबॉय येईल पेनड्राईव्ह घेऊन म्हणून मी दुसऱ्या दिवशी वाट बघत होते. 7.30 ला मोबाईल वरून फोन आला . जरा थकलेला ..पण मार्दवपूर्ण असा एका आजींचा आवाज होता . " मी आलेय फोटो घेऊन . डेक्कन च्या बस स्टॉप वर उतरलेय. पत्ता समजावून सांगता का ?"  अरे बाप रे ..एवढ्या वयस्क आजी . मी माझ्या लेकीला गाडीने पिटाळले त्यांना आणायला . झक्कपैकी टू व्हिलर वर बसून आजी आल्या . फिकटस नऊवारी पातळ , सुपारीएवढा अंबाडा , हसतमुख चेहरा आणि हातात मोबाईल आणि पेनड्राईव्ह छोट्याशा बटव्यात .  ब्रेकफास्ट ची वेळ होती . नवरा ग्राऊंडवरून 10 मिनिटात येणार होता . मी बटाटे पोह्यांची तयारी केली होती .मला कंपनीत फोटो आणि न्यूज पाठवायची होती . लेक पसार झाली काहीतरी काम काढून .  शेवटी मी डाईनिंग टेबलवर लॅपटॉप घेतला नि गॅसवर कढई ठेवली . माझी धांदल पाहून आजी म्हणाल्या , " मी ...

अक्षय तृतीया

अक्षय तृतीया अक्षय तृतीयेचे महत्त्व: अक्षय तृतीयेला ब्रह्मा व श्रीविष्णु यांच्या मिश्र लहरी उच्च देवतांच्या लोकांतून, म्हणजे सगुणलोकांतून पृथ्वीवर येतात. त्यामुळे पृथ्वीवरील सात्त्विकता १० टक्क्यांनी वाढते. अर्थ : सदोदित किंवा सातत्याने सुख व समृद्धि प्राप्‍त करून देणार्‍या देवतेची अक्षय तृतीयेच्या दिवशी कृतज्ञतेचा भाव ठेवून केलेल्या उपासनेमुळे आपल्यावर होणार्‍या त्या देवतेच्या कृपादृष्टीचा कधीही क्षय होत नाही. देवतेची कृपादृष्टि सदोदित आपल्यावर रहाण्यासाठी अक्षय तृतीयेला कृतज्ञ भाव ठेवून तिची उपासना करणे. मूर्तिका पूजन : सदोदित कृपादृष्टि ठेवणार्‍या मूर्तिकेमुळेच आपल्याला धान्यलक्ष्मी, धनलक्ष्मी व वैभवलक्ष्मी यांची प्राप्‍ति होते. अक्षयतृतिया हा दिवस म्हणजे कृतज्ञ भाव ठेवून मूर्तिकेची उपासना करण्याचा दिवस. मातीत आळी घालणे व पेरणी : पावसाळा तोंडावर घेऊन अक्षय तृतीया येते. वर्षाऋतूच्या आगमनाचा, म्हणजे मृग नक्षत्राचा व या तिथीचा घनिष्ट संबंध आहे. (घनिष्ट संबंध म्हणजे शुद्ध किंवा चांगल्या हेतूने परस्परांशी असेलेले घट्ट संबंध.) गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर नांगरलेल्या शेतजमिनीचे अक्षय तृत...

ऍनिव्हिओला...

ऍनिव्हिओला ....... ऍनिव्हिओला... हा शब्द जीए कुलकर्णींचा. त्यांच्या "इस्किलार" या दीर्घ कथेत या शब्दाची ओळख झाली. ही जीएंची खासियत. स्वत:च एखादा शब्द तयार करायाचा आणि तत्याला अर्थ द्यायचा. या कथेत असेच सेरीपी, इस्किलर असे शब्द त्यांनी निर्माण केले आणि त्यांना अर्थ दिले. ऍनिव्हिओला म्हणजे द्राक्षाचा रस ज्या क्षणी मद्य होतो तो जादूई क्षण. आपल्या आयुष्यात असे जादूई क्षण येतात. तो / किंवा ती... बरेच दिवस एकमेकांना पहात असतात. भेटत असतात. पण एक क्षण येतो, जेंव्हा दोघांनांही वाटतं आपण एकमेकासाठीच जन्मलोत. तो क्षण म्हणजे ऍनोव्हिओला ! आपण वर्गात बसलेलो असतो. रसायशास्त्राचं लेक्चर चालू असतं. व्याख्याता अगम्य भाषेत दोन रसायनांच मिश्रण केल्यावर तिसरंच रसायन कसं निर्माण होईल ते सांगत आसतो आणि वीजेचा लोळ अंगावर पडावा, तशी  आपल्याला कविता सूचते. वहीतलं पान फाडून आपण एकटाकी ती कविता पूर्ण करतो. तो क्षण म्हणजे ऍनिव्हिओला ! वर्तमानपत्रात शब्दकोडं आलेलं असतं. सगळं सोडवून झालेलं असतं, फक्त ते १६ आडवं आणि ५ उभं नं पंचाईत केलेली असते. बाजूला बायको टीव्ही पहात असते. त्या सिरीअल मधली आजीबाई  म्हणते...

पाना पानांचा राखा मान..

तुळशीचे पान - विष्णूपदी स्थान.. बेलाचे पान - शंकरचा मान.. केवड्याचे पान - नागाचे स्थान.. रुईचे पान - मारुतीची शान.. केळीचे पान - भोजनाशी छान .. नागवेलीचे पान - गोविंदविड्याला छान.. मेंदीचे पान - शकुनाचा मान.. पळसवडाचे पान- द्रोणपत्रावळी छान.. पिंपळाचे पान - मुंजाचे स्थान.. गुलाबाचे पान - काटेरी छान.. कढीपत्त्याचे पान - फोडणीत स्थान.. आळूचे पान - अळूवडीला छान.. तमालपत्राचे पान - मसाल्याची शान.. वहीचे पान - लिहायला छान.. पुस्तकाचे पान - माहितीची खाण.. गवताचे पान - दवबिंदू शोभायमान.. ओव्याचे पान - सुवासिक छान..त्याला भजीत - मान.. तुळशीचे पान - स्मरणिशक्तीला महान.. कोरफडीच पान - त्वचेला छान... आपट्याचे पान-त्याला सुवर्णांचा मान.. आंब्याचे पान - तोरणाची शान..त्याला शुभ कार्यांत - मान🌱 🌿पाना पानांचा राखा मान पाना पानांची जगवा शान🌿 🌳🌴🌳🌴🌳🌴 🙏🏻झाडे लावा झाडे जगवा🙏🏻