Skip to main content

Posts

Showing posts from April 4, 2021

मधुमालती

#मधुमालती 🌸🌿🌸🌿 नावातच मधु असलेली आणि उसाच्या पेरांपेरांत साखर भरलेली असते तशी देठादेठांत मध भरलेली ही मालतीची फुलं आपल्यालाच काय तर काळ्या मुंग्यांनाही माहित असतात.😁त्याशिवाय का त्या दिवसभर फुलांच्या आत बाहेर करत मध गोळा करतात?😛म्हणजे नावात काय आहे असं विचारणा-यांनाही कळेल की मधुमालतीची वेल आणि तिच्यावर येणारी फुलं हे प्रकरण किती गोड आहे ते !☺ही मधु आणि मालतीची जोडी पूर्वी लग्नात नाव ठेवतानाही आढळायची.म्हणजे नव-याचं नाव मधुकर किंवा मधुसूदन असेल तर बायकोचं नाव बदलताना त्याला हमखास मालतीच सुचवलं जायचं 😜 इतकी ही जोडी फेमस होती.मी पाचवीत रोह्याला असताना बाबांच्या एका मित्राकडे जाऊन "मधुकाका...उद्या संध्याकाळी आमच्या घरी हळदीकु़ंकवाला मालतीकाकूंना पाठवा" असं बेधडक निमंत्रण दिलं होतं.मग काकांनी हसत हसत सांगितलं की नक्की पाठवतो पण काकूचं नाव मोहिनी आहे ! 🙈म्हणजे तिथे नियमाला अपवाद होता.🤗हिचं नावच इतकं गोड आहे की सिंहासन बत्तिशी लिहितानाही नवव्या पुतळीचं नाव मधुमालती ठेवण्याचा मोह लेखकाला आवरता आला नाही ! तर अशी ही मधुमालती ही भारतीय वंशाची सदाहरित वेलवर्गीय वनस्पती.#कॉम्ब्र...