Skip to main content

Posts

Showing posts from June 2, 2020

सारस्वत मासे खाऊनही पवित्र ब्राह्मण कसे ?

👇🏻👇🏻 नक्की वाचा कथा.👇 दधीचि ऋषी आणि अलंबुजा अप्सरा यांचा मुलगा सारस्वत. इंद्राच्या सवयीनुसार दधीचीच्या तपश्चर्येत व्यत्यय आणण्यासाठी त्याने अलंबुजेला दधीचीकडे पाठविली होती. ती सरस्वतीच्या पात्रातून बाहेर आली. दधीचि तिथे स्नानासाठी आला होता. अलंबुजेने त्याला काममोहित केले. तपश्चर्या त्याने अर्धवट सोडली. तिच्याभोवती पिंगा घालण्यातच त्याचे दिवस जाऊ लागले. काही महिन्यांनी अलंबुजेला मुलगा झाला. त्याला दधीचिपाशी ठेवून ती स्वर्गात निघून गेली. ती सरस्वतीतून आली होती व तेथेच त्यांची प्रथम भेट झाली होती. या प्रसंगाची आठवण म्हणून दधीचिने मुलाचे नाव ठेवले *सारस्वत*. दधीचिने त्याला वाढवले व वेद-वेदांग-शास्त्रांत पारंगत केले. दधीचीने देवांना आपली हाडे देण्यासाठी प्राणत्याग केला. त्यानंतर देशाला अवर्षणाने ग्रासले. अन्नपाण्यासाठी लोक सैरावैरा भटकू लागले. ऋषीही तेच करू लागले. पठणासाठी त्यांना वेळ मिळेना. त्यामुळे त्यांचे ज्ञान पूर्ण हरवले. एकटा सारस्वत मात्र समुद्राकाठी राहिला. मासे खाऊन त्याने जीव जगवला. समुद्राला मिळणाऱ्या नद्यांचे गोडे पाणी तो पीत असे. दुष्काळ संपला. आपले ज्ञान विस्मृतीच्या पड

*बायकांकडून नव-यांना संबोधण्या बाबतचा इतिहास तुम्ही वाचलाच पाहिजे*

न्या. रानडे यांच्या घरी एकदा कोणी   गृहस्थ आले. न्यायमुर्ती घरी आहेत का विचारलं. रमाबाई म्हणाल्या, *"खुंटीवर पगडी दिसत नाहीये."* त्या माणसाला काही कळलं नाही.  त्याने परत विचारलं. रमाबाई म्हणाल्या, *"जोडेही दिसत नाहियेत."* तरिही त्याला कळलं नाही त्याने पुन्हा तेच विचारलं. रमाबाई म्हणाल्या, *"कोपऱ्यात काठीही दिसत नाहिये."* *ते घरी नाहियेत हे सांगण्याची ही त्या काळची पद्धत झाली.* नावाने सोडाच पण *"हे"* वगैरे उल्लेखही केला जात नव्हता त्या काळी. *का. पु. स. (काळ पुढे सरकला)* ..... नवर्‍याचा उल्लेख *"इकडुन येणं झालं"*, तिकडुन सांगणं झालं *"इकडची स्वारी"* असा होऊ लागला. मऱ्हाटी शिणुमात *"एक माणुस रागावलंय जणू आमच्यावर"* असा लडिवाळपणा झरु लागला. *का. पु. स.* ..... नवर्‍याचा उल्लेख *अहो, माझे यजमान, माझे मिस्टर असा होऊ लागला*. *का. पु. स.* ..... नवर्‍याला चारचौघांच्यात *अहो*, तर *एकांतात लाजत लाजत अरेतुरे* सुरु झालं. याशिवाय  *खाशा स्वाऱ्या, घरधनी, कारभारी, मालक, पप्पुचे पप्पा, बंटीचे बाबा, अहो नारायण* हा एक समांतर प्रवास चाल