Skip to main content

Posts

Showing posts from August 1, 2020

मनातले बोल

१.  खळाळत्या नदीतीरी सांज झाली ग उनाड मनी माझ्याही उधाण , जणू फेसाळ सागर ! हात लागती आभाळा  चित्त क्षितिजापल्याड ! भेटतील दोन तीर होती मोकळी कवाडं हिरवाई उधळून मन माझही लबाड !!!               सौ लतिका गांगल २. कोपरा एक किंचितसा काजळलेला , आठवांचे साठव होऊन जरा जळमटलेला संधीप्रकाशात कुठेसा हरवलेला , ना दिवा ना पणती काहीसा विझलेला !    गतस्मृतींच्या कॅलिडोस्कोपने सांधलेला      नाजूकसा एक  सांधा     काहीसा निखळलेला !      दोस्तीतल्या रुसाव्याफुगव्यांनि            थोडा भागलेला ,           अनामिकेने अबोला तर  दोन बोटांच्या मिठीने रुसवा                  संपवलेला !  कोपरा तो एका अनामिक ओढीने              व्यापलेला  शैशव चांदण्यांनी आता            उजळलेला  नको साद पुनवकौमुदिस आता        असे तो प्रकाशलेला !!!                     ~ लतिका गांगल. ३. परीटघडीत रोजच घरात येणारा काळा पांढरा समाजरंग  संयतअभिमानाने अंगी मिरवणारा वाफाळत्या चहाची खुमारी वाढवणारा पुरवणीतून कॉफीलाही सायंनशा आणणारा "पत्र नव्हे मित्र"  बिरुद बाळगणारा ! आज बरेच दिवसांनी भेटला रागरंग गंध  वेगळाच भासला तमस जो जगी ग्रास