Skip to main content

Posts

Showing posts from July 9, 2020

आठवणीतील कविता

१. ।।आठवणीतील कविता ।।  दहा दिवस दहा कविता  3 जुलै 2020      नमस्कार!  मी वृंदा अरविंद जोगळेकर.  आज माझ्या  आठवणीतील  आवडती कविता सादर करीत आहे.मला या उपक्रमात माझी मैत्रीण वर्षा विजय देशपांडे हिने आमंत्रित केले आहे आणि मी माझी मैत्रीण अनघा नासेरी हिला  या उपक्रमात सहभागी  करतेय. या उपक्रमातील  माझी ही पहिलीच कविता आहे आजची माझी पहिली कविता म्हणजे संत तुकाराम महाराज यांचा अभंग आहे .  आकाशातले काळे दाट मेघ आषाढ महिन्याची नांदी देतात आणि चंद्रभागेच्या काठावर विठ्ठलभक्त जमू लागतात. गोपीचंदनाची उटी आणि तुळशीच्या माळांचा साज चढवलेले हे वारकरी विठ्ठलाचे नामस्मरण करताना टाळ-मृदंगाच्या तालावर देहभान विसरतात. राग-लोभ, मोह-माया यांच्या पलिकडे जाऊन केवळ भक्ती हाच भाव प्रत्येकाच्या मनात उरतो. रंग-रूप, जात-पात, लहान-थोर, उच-नीच कसलाही भेदच उरत नाही. सारा आसमंत विठोबामय होतो. निर्मळ भक्तीची ही पायवाट हा भवसागरातून आपल्याला तारून नेईल असा विश्वास तुकोबा प्रत्येकाच्या मनात जागवतात.  यंदा पंढरीची वारी होऊ शकली नाही. पण हे चित्र प्रत्येक विठ्ठलभक्ताने मनात जगलं असणार. त्या विठ्ठल माऊली च्या पायाशी मनःपू

फुंकर

*फुंकर* चुलीतल्या धुमसत्या लाकडांवर फुंकर घातल्यास त्यातून आगीच्या ज्वाला पेटतात ज्याने अन्न शिजते. कुणाच्या भाजलेल्या त्वचेवर अथवा जखमेवर फुंकर घातल्यास तिथला दाह कमी होतो. शाळेत कधी डोळ्यात काही पडलच तर बाजूची मैत्रीण तिच्या चिमुकल्या हातांनी डोळा मोठा करत त्यावर फुंकर घालायची जेणेकरून डोळ्यात पडलेला कण उडून जायचा. कुणाच्या दु:खावर मायेच्या आश्वासक शब्दांची फुंकर घातल्यास त्या व्यक्तीस दु:ख सहन करण्याची,त्यातून बाहेर पडण्याची ताकद मिळते. नवथर तरुणीच्या अल्लड बटांवर तिच्या प्रियकराने घातलेली हलकीशी फुंकरही तिच्या कायेत रोमांच फुलविते.  आठवणींच्या  वहीवर फुंकर घालताच अनेक आठवणी पिंगा घालतात. आठवणींची साखळीच तयार होते. अन ही गुंफण तजेला देते. गरमगरम कॉफीचा फुंकर घालून आस्वाद घेण्याचा नाद वेगळाच.  लहानपणी लाजरीच्या पानांवर हळूवार फुंकर घालून ती मिटताना पहाणं हाही एक नादच होता. बशीतला गरम चहा एकाकडेने आजी/आई धरते व दुसऱ्या कडेने बाळ बशीला गच्च पकडते. मग आई हळूवार फुंकर घालते चहावर जेणेकरून बाळाच्या जीभेला चटका लागू नये. ते पाहून बाळाला अजून मजा येते. बाळपण मग फुर्र फुर्र करत चहा पिऊ लागतो