Skip to main content

Posts

Showing posts from April 10, 2016

कविता कि कथा - खूपच तरल

लेखक : चंद्रशेखर गोखले यांची.. एंक खूप छान कथा..... कायद्याने दोघे वेगळे झाल्यावर त्याने राहतं घर विकायला काढलं. ब्रोकरच्या थ्रू तिच्या वडिलानीच ते घर विकत घेतलं...... पून्हा घराची एक किल्ली त्याच्या हातात देत म्हणाले... 'मी माझ्या लेकीला ओळखतो ..... तसा तुलाही.. ... सगळ्या गोष्टी भावनेच्या भरात करतोस... अगदी माझ्या लेकीशी लग्न सुद्धा...... पून्हा भावनेच्या भरात एकत्र यावसं वाटलं तर? तसं व्हायला नको... म्हणून ही रिकामी वास्तू तुझ्या हवाली करतो...... कधी वाटलं तर येऊन बसत जा..... "भरल्या घरा पेक्षा रिकामं घर जास्त बोलतं आपल्याशी......" भावनेपेक्षा विचार जास्त ठाम असतात...... विचारांवर ठाम झालास तर ...... घेतल्या निर्णयाचा पश्चाताप होणार नाही.. ... निर्णय ठाम झाला की माझी किल्ली मला परत दे. ..... नाहीतर येऊन माझी मुलगी परत घेऊन जा......' आणि खरच तो ढळत्या दुपारी रिकाम्या घरात बसायला लागला...... कलंडणारी ऊन्ह आपल्या घरात अशी ऐसपैस पसरतात त्याला माहीतच नव्हतं... ... माव...