Skip to main content

Posts

Showing posts from July 24, 2020

दक्षिणा,आहेर, बक्षीस हे ११, ५१, १०१ अशा रकमेचे का देतात ?

दक्षिणा,आहेर, बक्षीस हे  ११, ५१, १०१ अशा रकमेचे का देतात ?                          आपल्याकडे अशा अनेक चालीरिती आहेत ज्या लोकं वर्षानुवर्षे कसोशीने पाळतात पण त्या आपण का पाळतो हे अनेकांना माहिती नसते. त्यातील एक प्रथा म्हणजे दक्षिणा,आहेर, बक्षीस हे ५१, १०१, ५०१ अशा रकमेचे देणे. आता श्रावण महिना सुरु झाला आहे. भटजींना दक्षिणा, १० वी  / १२ वी उत्तीर्ण झालेल्यांना कौतुक म्हणून बक्षीस, धार्मिक कार्यांमध्ये आहेर हा रोख देतांना नेहेमी सम रकमेत  १ रुपया मिळवून ती रक्कम विषम करूनच दिला जातो. या मागची अनेक करणे आणि समजुती आपण आज जाणून घेऊया.                            मान्य केलेल्या रकमेपेक्षा थोडेसे अधिक दिले तर घेणारा खूष होतो. कोकणात पूर्वापार आंबे, काजू अशा गोष्टी शेकड्यावर घेतल्या जात असत. त्याचे १०० मोजले की अधिक ५ फळे तरी दिली जात असत. मापट्याने ( फरा, पायली ) धान्य मोजताना पहिला पसाभर देवासाठी आणि शेवटी पाच पसा अधिक दिले जायचे. युरोपात एकदा एका बेकरीवाल्याने १ डझन म्हणून चुकीने १२ ऐवजी १३ वस्तू दिल्या. त्यामुळे तिकडे १३ वस्तूंना बेकर्स डझन म्हणतात.                          विषम रकमेच्या

नारळ..,ऋणानुबंधाचे धागे

नारळ... ...हक्कसोडपत्रावर सह्या केल्यावर अंबीने पदरानं डोळे पुसले. दोन एकराच्या तुकड्यातली चिमूटभर जमीन विकण्याशिवाय शांतारामला गत्यंतर नव्हते. अंबीचं सासर खाऊनपिऊन सुखी होतं पण भाऊ अठरा विश्वे दारिद्र्यात...भाऊ दांडेकराला जमीन विकणं क्रमप्राप्त होतं. हक्कसोडपत्रावर सही हवी अंबीची, त्याशिवाय जमीन खरिदणार नाही असा भाऊचा कडक नियम होता. आता जेमतेम दोन एकराचा विश्वंभराच्या घाटीजवळचा तुकडा शांतारामकडे उरलेला होता. हक्कसोडपत्रावर सही करताना प्रॉपर्टीतला वाटा गेल्याचं दुःखं अंबीला अजिबात नव्हतं पण माहेरच्या नात्यातला शेवटचा धागा तुटल्यासारखा झालं होतं. शांतारामची बायको पुढे आली, “अंबीवन्सं हक्कसोड झाली म्हणून नाती तुटली नाहीत हो. तुम्ही असं मनाला लावून घेऊ नका. मी बोलले यांना...पाटील मास्तरांच्या हद्दीजवळची म्हणजे तलावाशेजारची दोन नारळाची झाडं आजपासून तुमची हो... जे काही नारळ येतील वर्षाचे ते हक्काने घेत चला. आम्ही पूजेलाही त्यातला नारळ घेणार नाही बघा. शिवाय वाडी शेती तुमच्या भावाचीच आहे . कधीही या, पिकेल त्यातली मुठभर सुपारी आणि पायली दोन पायली भात मला जड नाही हो” अंबीने डोळे पुसले... आणि पु

राजेंद्र भारूड IAS

माझा जन्म कोणाच्या घरात आणि कोणत्या समाजात व्हावा हे माझ्या हातात नव्हतं. मी साक्री तालुक्यातीला सामोडे गावात  भिल्ल जमातीत जन्म घेतला आणि माझं जगणं सुरू झालं.  जगताना पावलो पावली संघर्ष होता, अडचणी होत्या. परिस्थिती  प्रतिकूल होती; पण त्याचा बाऊच करत राहिलो असतो तर आज ही आयएएस ऑफिसर्पयतची मजल गाठता आलीच नसती. मला माझ्या आयुष्यात कोणतीच गोष्ट सहज मिळाली नाही, किंबहुना मिळालीच नाही. अभावाच्या या जगण्याला निसर्गाची भक्कम सोबत होती. निसर्गाचा सहवास होता म्हणून लढायला ताकद मिळाली. उसाच्या पालाची झोपडी म्हणजे माझं घर. मी मायच्या पोटात होतो तेव्हाच वडील वारले. घरची एवढी गरिबी की वडिलांचा साधा फोटो काढायलाही पैसे नव्हते. माझे वडील कसे होते हे मला कधीच कळलं नाही. आमच्याकडे ना जमीन होती ना शेती. घरात कर्ता पुरुषही नव्हता. मायवरच सगळी जबाबदारी येऊन पडली; पण ती डगमगली नाही की कधी रडली नाही. ती पोट चालवण्यासाठी मोहाची दारू गाळण्याचा व्यवसाय करत होती. घरातच चालायचा तो. पिणारेही घरीच यायचे. माय सांगते, मी लहान होतो. दुधासाठी रडायचो; पण दारू पिणार्‍यांना त्रास नको म्हणून माझ्या तोंडात दुध