Skip to main content

Posts

Showing posts from August 13, 2020

पंतप्रधानांकडून शुभेच्छा

[8/13, 20:20] आपली मा.वि. अरुंधती वाकडे. सौ. अरुंधती प्रविण दीक्षित. आवर्जून वाचा.  सुहृदहो, 😊☺️😄😇 काल प्रवीण दीक्षितांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा पूर लोटला. ज्यांना त्यांचा फोन नंबर वा मेलचा पत्ता माहित नव्हता त्यांनी माझ्याकडे हा शुभेच्छांचा ओघ वळवला. सरकारी अधिकारी खुर्चीवरून उतरला की तो विस्मृतीच्या टोपलीत नकळत सरकवला जातो. त्यातल्या त्यात पोलीस अधिकारी तर नक्कीच. पण तसे झाले नाही. अनेक सुंदर सुंदर कविता लोकांनी आपणहून करून पाठविल्या; कोणी श्लोक, कोणी सुंदर पत्रे लिहीली. कोणी त्यांच्या आठवणी, कोणी फोटो. आपण सर्वांनी दिलेल्या शुभेच्छांनी दिवस सुंदर झाला.                 अनपेक्षित आलेला एक शुभेच्छा संदेश खूप खूप मोहरवून गेला. मोहवून गेला. तो संदेश होता पंतप्रधान नरेद्र मोदीजींकडून आलेला.  वाढदिवसाच्या शुभेच्छांचा. त्यांच्या अक्षरात, त्यांच्या सहीचा. डाव्या बाजूला अमृतसरच्या सुवर्णमंदिराची प्रतिमा तर उजवीकडे मोदीजींचा फोटो आणि वाढदिवसानिमित्त शुभेच्छा संदेश! परत परत पाहतांना किती आनंद झाला म्हणून सांगू? एवढ्या मोठ्या लोकसंख्येच्...

संस्कृत हीच ज्ञानभाषा

।।संस्कृत भाषेची किमया।।                    इंग्रजी भाषेचा अभ्यास करताना एक वाक्य सतत सांगितले जाते ते म्हणजे " A QUICK BROWN FOX JUMPS OVER THE LAZY DOG" या वाक्यच विशेषत्व हे आहे की ह्या वाक्यात इंग्रजी वर्णमालेतील सर्व वर्ण आले आहेत. पण आपण जर पाहिलं तर ह्या वाक्यात काही त्रुटी आढळून येतात जसं की इंग्रजी वर्णमालेत २६ वर्ण असताना इथे मात्र ३३ आले आहेत. O,A,E,U,R ह्यांचा परत परत वापर केला गेला आहे.तसेच A,B,C,D... हा क्रम पाळला नाही ये.                        तेच जर आपण खालचा श्लोक पाहिला तर संस्कृत भाषेची किमया आपल्याला लक्षात येईल-               क:खगीघाङ्चिच्छौजाझाञ्ज्ञोटौठीडढण:।             तथोदधीन पफर्बाभीर्मयोSरिल्वाशिषां सह।। अर्थात - पक्ष्यांचं प्रेम,शुद्ध बुद्धीचा,दुसऱ्याच्या बलाच अपहरण करण्यात पारंगत, शत्रू संहारात अग्र, मनाने निश्चल व निर्भीड आणि महासागराच सर्जन करणारा कोण आहे? असा राजा मय ज्याला त्य...