Skip to main content

Posts

Showing posts from February 22, 2019

माझा २७ वर्षाचा प्रवास

लग्न हा स्त्री च्या आयुष्यातला एक game changing event असतो। माझी पिढी तशी भाग्यवानच । हवे ते शिक्षण घेता येणारी आणि आपले लग्ना विषयी चे मत ठामपणे सांगणारी, बहुदा ही पहिलीच पिढी। माहेरी असे पर्यंत शाळा, कॉलेज, खेळ, इतर छंद जोपासणारी। कधी मधी आवडीने एखादा पदार्थ करणारी किंवा वेळ आलीच तर स्वयंपाकघर सांभाळणारी, एरव्ही नाही। आणि मग मनासारखे शिक्षण घेऊन करिअर कडे पाऊल घेत, स्वतःच्या पायावर उभी राहणारी, भावी आयुष्याचे स्वप्न रंगवणारी। त्यातलीच एक मी।। आकाशभरारी घेण्याची उभारी असताना, लग्नाच्या उंबरठ्यावर मात्र बरीच ठेचकाळली। वकील मुलगी नको, उगाच घरात आणली तर एकाचे दोन होतील, घरातच वकिली डावपेच खेळेल, त्यात स्त्री कायदा बलवान। तर कोणी गव्हर्नमेंट job करणारीच हवी। कोणाचे काही तर कोणाचे काही। बाकीच्या मैत्रिणींचा काय अनुभव आहेत माहीत नाही, पण मला लग्न करताना एक वेगळेच समाजाचे रूप पहावयास मिळाले। तशी मी हळुवार, स्वप्नाळू होते, म्हणजे कवी मन ठेवणारी, त्यामुळे या अनभिज्ञ समाजाचे पोकळ रूप पाहून खूप कीव आली, मी सबला आहे, जगाला कणखर पणे तोंड द्यायची हिम्मत आणि तयारी आहे। मनाचे सर्व कोमल पाश तोडून, झाश