Skip to main content

Posts

Showing posts from April 4, 2017

चैत्रातील रांगोळी

31/03/17, 6:53 PM - Messages you send to this group are now secured with end-to-end encryption. Tap for more info. 02/04/17, 7:32 PM - Sunil Bhat: ****भाऊचा धक्का एकेकाळी कोकणी आणि गोंयकार प्रवाशांनी गजबजणाऱ्या मुंबईतील भाऊच्या धक्क्याला यंदा दीडशे वर्षं पूर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने भाऊच्या धक्क्याच्या इतिहासाची ही सफर.... बंदरापलीकडील रेवसहून अखेरची बोट सातवाजता भाऊच्या धक्क्याला लागली आणि दिवसभर गजबजलेला तो कोकणी माणसाचा सखा भाऊचा धक्का सुस्तावला. गेली दीडशे वर्षं अव्याहतपणे मुंबईत कोकण्यांची आणि गोवेकरांची सेवा करणाऱ्या या धक्क्याच्या प्रत्येक चिऱ्याला मग वाचा फुटली. कारण अलिबागहून आलेल्या एका नवश्रीमंत फार्महाऊसवाल्याने "ये कौन भाऊ है जी ? टर्मिनस को जिसका नाम दिया है वो ?" असे कुत्सित उद्गार काढले. गेली दीड शतकं या धक्क्यावर गरीब कोकणवासी मुंबईत मिसळून जाण्यासाठी उतरत असत. त्यांना हा प्रश्न कधी पडला नाही. उलटअभिमान असा की, 'भाऊ' हे घरगुती बिरुद जलवाहतुकीच्या टर्मिनसला दिलं आहे आणि ते अनेक बेस्ट बसेसवर मराठीत झळकत आहे ! कारण याचा जन्मदाता भाऊ अजिंक्य हा पक्का मु...