Skip to main content

Posts

Showing posts from June 26, 2021

निवेदकाचे / गोष्ट सांगणार्याचे सहा गुण

माधुर्यम् अक्षरव्यक्ती: पदच्छेद: तु सुस्वर: ।  धैर्यम् लयसामर्थ्यम् च षडेते पाठका गुणा: । भाषेचा गोडवा, अक्षरांचे उच्चारण, शब्दांचा योग्य तो पदच्छेद - (योग्य ठिकाणी शब्द तोडणे, pause घेणे, जोर देणे वगैरे), सुस्वर - आवाजाचा गोडवा ,  धैर्य - धीटपणा / आत्मविश्वास, आणि लयसामर्थ्य  - योग्य तो आवाजाचा चढ उतार आणि लय (monotonous नसणे), हे पाठकाचे - म्हणजे निवेदकाचे / गोष्ट सांगणार्याचे सहा गुण असतात / असावेत.  मदन