Skip to main content

Posts

Showing posts with the label जडगांवच्या वांग्याचे भरीत पुराण

जडगांवच्या वांग्याचे भरीत पुराण

🧄🧅जडगांवच्या वांग्याचे भरीत पुराण🧄🧅 डिसेंबर, जानेवारी महिन्यात तुम्ही कधी *जळगावला* गेलात  आणि भरताची चव न चाखताच परत गेलात, तर तुमची फेरी वाया गेली म्हणून समजा. तुमचे नातलग, मित्र *जळगावी* राहत असतील आणि त्यांनी तुमच्या पाहुणचारासाठी *बामणोद हून* आणलेल्या वांग्यांचे, आसोद्याच्या माणसाने तयार केलेल्या भरताचे जेवण ठेवले नाही, तर तुमच्या नातलगांचे, मित्राचे तुमच्यावर खरे प्रेम नाहीच, याची तुम्ही खूणगाठ बांधायला हरकत नाही. जळगावला येऊनही इथले भरीत खाऊ घालत नाही म्हणजे काय?  *जळगावातली भरताची पांढरी, हिरवी वांगी आणि त्यांचे विशिष्ट पद्धतीने केलेले भरीत ही चीजच आहे तशी. वातावरणात थंडी असताना एखाद्या शेतात भरीत पार्टीला उपस्थित राहणे, हा इथे उत्सव असतो. अंगाला झोंबणारी थंडी, समोर केळीचे पान, त्यावर गरम गरम भरीत, शेजारी तशीच कळण्याची गरम गरम भाकरी, मुळ्याच्या फोडी आणि तोंडी लावायला दही घातलेली टोमॅटोची कोशिंबीर. आहाहाहा! असल्या पार्टीच्या आठवणीनेही अस्सल *जळगावकर* कासावीस होतो. परवा सहज इंटरनेटवर *‘भरीत’* असा शब्द टाइप करून सर्च करण्याचा प्रयत्न केला तर *‘खान्देशी भरीत’* सर्व जगभ...