Skip to main content

Posts

Showing posts with the label गटारी नव्हे दीप अमावस्या !

गटारी नव्हे दीप अमावस्या !

दीप अमावस्या मकरंद करंदीकर यांची पोस्ट शेअर करतेय. गटारी नव्हे दीप अमावस्या ! ( हिंदूंच्या  मंगलपूजेचे गटारीकरण नको ) येत्या सोमवारी २० जुलै रोजी दीप अमावस्या आहे. हिंदूंच्या सर्वाधिक कुचेष्टेचे, विकृत विनोदांचे  जे सण आहेत त्यात वटपौर्णिमेनंतर दीप अमावस्या हा सण येतो. सण साजरे करताना आधी आपणच त्यात अनेक विकृती येऊ देतो आणि नंतर     “ आम्हाला आमचे सण साजरे करू द्या “ म्हणून न्यायालयाच्या दारात जातो. म्हणूनच दिव्यांच्या या अस्सल मंगल मराठी सणाला आपण गटारात नेण्याचे पाप करू नये असे मला वाटते. व्यक्तिगत पातळीवर गटारी साजरी करण्याचा प्रत्येकाला हक्क आहे. पण दीपपुजेऐवजी केवळ गटारी म्हणून याला वृत्तवाहिन्या, वृत्तपत्रे, SMS, फेसबुक, whatsapp इत्यादींवर कुप्रसिद्धी मिळू नये.  दारूच्या बाटल्या, कोंबड्या, बोकड यांची चित्रे " शुभेच्छा म्हणून एकमेकांना पाठविणे, Happy Gatari म्हणून wish करणे या वाईट गोष्टी आपण कटाक्षाने टाळाव्यात. जो आपला सणच नाहीये त्यासाठी आपण आपला धर्म का म्हणून बदनाम करायचा ? उलट महाराष्ट्रातील सर्व जातींच्या लाखो घरांमध्ये मोठ्या भक्तिभावाने या दि...