Skip to main content

Posts

Showing posts from June 25, 2020

रिटायर्ड माणूस

*जगांत सर्वात लक्ष न देण्याजोगा प्राणी म्हणजे रिटायर्ड माणूस...*              *- पु.लं.* रिटायर्ड माणसांनो, भावांनो, सहकार्यांनो... जगांत सर्वात लक्ष न देण्याजोगा प्राणी म्हणजे रिटायर माणूस. पु.लं च्या भाषेत सांगायचं म्हणजे पुण्याच्या दुकानदारांच्या नजरेतून सगऴ्यात दुर्लक्षीत प्राणी म्हणजे गिर्हाईक.  अगदी त्याचप्रमाणे समजा... गरिब बिचारा, भांबावलेला,  बावरलेला, आत्मविश्वास हरवलेला असा हा प्राणी असतो. कोणे एके काळी या माणसाचे पण सुगीचे दिवस असतात. त्याचा रूबाब वाखाणण्याजोगा असतो. सर्व गोष्टी हातात मिळत असतात. घरी व कार्यालयात. टेबलावरून फायली फिरत असतात. मोठ्या मोठ्या करारांवर सह्या होत असतात. नुसती बेल वाजवलीना, तरी  तीन तीन शिपाई धावत येत असतात. एक चहा घेऊन, एक बिस्कीटं घेऊन, तर एक बडीशोप घेऊन.  अहाहा... त्या शिपायाच्या चेहऱ्यावर भाव असतो,  तो हा, की साहेब हे फक्त आपल्याचसाठी.  आणि आता, टेबलावर  मिरच्यांची देठं काढली जातात. भेंडी पुसली जाते. लसणाच्या पाकळ्या मोकळ्या होतात. अरेरे... किती हा विरोधाभास. रिटायर्ड माणसाला कुठंही डोकं चालवायला वा मध्ये घालायला बंदी असते. कधी कधी मला तर वाटत...