*जगांत सर्वात लक्ष न देण्याजोगा प्राणी म्हणजे रिटायर्ड माणूस...*
*- पु.लं.*
रिटायर्ड माणसांनो,
भावांनो,
सहकार्यांनो...
जगांत सर्वात लक्ष न देण्याजोगा
प्राणी म्हणजे रिटायर माणूस.
पु.लं च्या भाषेत सांगायचं म्हणजे
पुण्याच्या दुकानदारांच्या नजरेतून
सगऴ्यात दुर्लक्षीत प्राणी म्हणजे
गिर्हाईक. अगदी त्याचप्रमाणे
समजा...
गरिब बिचारा, भांबावलेला,
बावरलेला, आत्मविश्वास
हरवलेला असा हा प्राणी असतो.
कोणे एके काळी या माणसाचे
पण सुगीचे दिवस असतात.
त्याचा रूबाब वाखाणण्याजोगा
असतो. सर्व गोष्टी हातात मिळत
असतात. घरी व कार्यालयात.
टेबलावरून फायली फिरत
असतात. मोठ्या मोठ्या
करारांवर सह्या होत असतात.
नुसती बेल वाजवलीना, तरी
तीन तीन शिपाई धावत येत
असतात. एक चहा घेऊन, एक बिस्कीटं घेऊन, तर एक
बडीशोप घेऊन.
अहाहा... त्या शिपायाच्या
चेहऱ्यावर भाव असतो,
तो हा, की साहेब हे फक्त
आपल्याचसाठी.
आणि आता, टेबलावर
मिरच्यांची देठं काढली जातात.
भेंडी पुसली जाते. लसणाच्या
पाकळ्या मोकळ्या होतात.
अरेरे... किती हा विरोधाभास.
रिटायर्ड माणसाला कुठंही डोकं
चालवायला वा मध्ये घालायला
बंदी असते. कधी कधी मला तर
वाटतं, की रिटायर माणूस त्याचं
डोकं फक्त उशीवर टेकवायलाच
वापरत असावा सध्या. बिच्चारा.
कुणी समदु:खी माणूस त्याला
घरी भेटायला आलाच, तर हिंदी
चित्रपटात यात्रेत हरवलेला भाऊ
भेटल्यावर नायकाला जो आनंद
होतो, अगदी तसाच किंबहूना
त्याहून जास्त आनंद रिटायर्ड
माणसाला होतो. पण त्यांचं
बोलणं किचनचा "सी.सी." टिपत
असतो, हे त्याच्या ध्यानी नसतं.
आपल्या सुगीच्या दिवसांत हा
माणूस कट्टयावर मित्रांसमवेत
हास्य विनोद करत असतो.
मधून मधून नेत्र व्यायामही
सुरू असतो. तोच बिचारा
आता मंदिराच्या कट्टयावर वा
वाचनालयाच्या ओट्यावर
विसावलेला असतो.
ज्या चौपाटीवर सणसणीत
भेळ, रगडा, बर्फाचा गोळा
खातांना नजर भिरभीरत
ठेवलेली असते, गार वार वारा
अंगावर घेत रिटायर्ड नंतरच्या
आयुष्याची स्वप्न रंगवलेली
असतात, तिथेच चटई टाकून
योगा करायची वेळ आलेली
असते.
दिवसभरांत टोमणे ऐकावे
लागतात. "ते शेजारचे बघा,
या वयातही किती फीट व धीट
आहेत. नाही तर तुम्ही बघा,
भित्रे काळवीट". वगैरे वगैरे.
अरे कांय, आहे कांय हे...!?
एक नवीन मुद्दा मला कळलांय,
तो तुम्हाला सांगतो. या रिटायर्ड
माणसांचा उल्लेख पुराणांत
म्हणजे महाभारतातसुध्दा आला
आहे.
चक्रावलात नां..? मग ऐका.
समोर सागराप्रमाणे पसरलेला
विशाल सैन्याचा समुह. त्यातले
स्नेही, आप्तेष्ट पाहून अर्जुन
जेव्हा युध्द करायला नकार देतो,
तेंव्हा कृष्ण भगवान अर्जुनाला
म्हणतात...
*अर्जुना असा रिटायर्ड माणसासारखा हताश व निराश होऊ नकोस. उठ व लढायला सज्ज हो...!!*
पुढं कालांतरानं रिटायर हा
शब्द गीतेतून वगळण्यांत
आला. कां, तर भविष्यांत
रिटायर्ड लोकांच्या भावना
दुखाऊ नयेत..!!
बघा, लोकहो... त्या काळांत
पण यांच्या भावनांची कदर
केली जात होती आणि आता
सुकलेल्या पालापाचोळ्याप्रमाणे
त्या पायदळी तुडवल्या जातात.
अरेरे...!!
सरते शेवटी भगवंतानं रिटायर्ड
लोकांना हताश न होण्याचा मार्ग
सुचवला.भगवान म्हणाले...
"अरे वत्सा, रिटायर्ड माणसा...
हताश व निराश होऊ नकोस,
मी तुला फंड व पेन्शन या
दोन गुळाच्या वेेली देतो. जो
पावेतो त्या तुझ्याकडं आहेत,
तोवर तुला मरण नाही".
"मरण नाही, म्हणजे खरं मरण
नाही. रोजच्या जीवनात तू ज्या
यातना वा अपमान भोगशील,
त्या यातना तुझ्याकडं असलेल्या
या दोन शस्रांनी सुसह्य होतील.
फंड व पेन्शन जो पावेतो
तुझ्याकडे आहेत, तो पर्यंत सारे
तुझे असतील".
*"उठ, वत्सा उठ आणि* *आयुष्याच्या*
*संग्रामास तयार हो. उठ"...!!*
खाडकन जाग आली...
भानावर आलो, आणि माझी *ती दोन शस्र* जागेवर आहेत, की नाही हे बघण्यासाठी अंथरूणातून बाहेर आलो.
Source WhatsApp .
Author unknown.
Comments
Post a Comment