Skip to main content

Posts

Showing posts from April 18, 2017

"पाच पांडव म्हणजे आपली पंचेंद्रिये"

महाभारतात संजय शेवटी प्रत्यक्ष कुरुक्षेत्रावर पोहोचला, तेच कुरुक्षेत्र, जेथे महाभारतातील निर्णायक युद्ध संपले होते; आपल्याला प्राप्त झालेल्या दिव्यदृष्टीने ज्याचे वर्णन त्याने धृतराष्ट्राला केले होते. प्रचंड विध्वंस झालेल्या त्या रणभूमीवर त्याला एकदा यावंच लागणार होतं.   'का झाले हे युद्ध ? हे खरंच अटळ नव्हते का ? एवढा प्रचंड नरसंहार एवढ्या कमी दिवसांत का केला गेला ..? मी जे पाहत होतो ते खरंच घडलंय का ..?'  याची शहानिशा करायला त्याला युद्धभूमीवर येणं भाग होतं.  त्याने चहूदिशांना पहिले, 'खरंच एवढं मोठं युद्ध झालं? हीच ती रणभूमी ज्यावर रक्तामांसाचा खच पडला होता ? फक्त अठरा दिवसांत भरतखंडातील 80 टक्के पुरुष वंश नामशेष? हीच ती भूमी जिथे भगवान श्रीकृष्ण अर्जुनासह उभे ठाकले होते?'  " यामागील सत्य तुला कधीच समजणार नाही," एक वृद्ध कंपित आवाज ऐकू आला. संजयाने वळून पाहिले तो धुळीच्या लोटातून भगव्या कपड्या तील एक वृद्ध योगी प्रकट झाला!   "मला माहित आहे, तू इथे का आला आहेस, परंतु हे युद्ध कळण्यासाठी खरं युद्ध कोणाशी असतं ते तुला समजून घ्यावे लागेल!"  वृद्ध योगी ...

मराठा महायोद्धा बाजीराव

As received on whatsapp- Milind:  जगणं विसरू नकोस....   प्रा. गणेश गर्दे यांची संपूर्ण महाराष्ट्रभर गाजत असलेली आणि प्रत्येक महिलेचा आत्मविश्वास वाढविणारी, स्वाभिमान उंचावणारी कविता....                                                                      त्यांच्याच "चांदणझुला" मधून एक नवी कोरी कविता...... "जगणं विसरू नकोस...." "सखे," जगाकडे रोज नव्याने.. बघणं विसरू नकोस.... सखे तू मुक्तपणे तुझं.. जगणं विसरू नकोस.... तुला निराश करणारे  अनेक क्षण येतील... पाय घालून पाडणारे  अनेक जण येतील... त्यांना घाबरून तुझं तू चालणं विसरू नकोस.. नि सखे तू मुक्तपणे तुझं.. जगणं विसरू नकोस....  तुझं कौतुक प्रत्येकाला इथं  रुचेलच असं नाही... कौतुकासाठी तुझं नाव सुचेलच असं नाही... कौतुक मिळवण्यासाठी, काम करणं विसरू नकोस... नि सखे तू मुक्तपणे तुझं.. जगणं विसरू नकोस....  तुला सुद्धा मन आहे  याचा विचार कर... बदलवणा-या मानसिकतेचा जोरात प्रचार कर... काळजापासून माया तुझी  झरणं विसरू नकोस... नि सखे तू मुक्तपणे तुझं.. जगणं विसरू नकोस....  रडावंसं वाटेल तेव्हा  रडून मोकळी हो... लढावंसं...