Skip to main content

Posts

Showing posts from July 20, 2020

हरकत

अत्यंत सुंदर कविता आहे पण निनावी फिरत आहे. कोणाची आहे हे माहीत नाही. *हरकत* मी विसळत होते उष्टी भांडी.. जेव्हा तू बोलत होतास,  परिसंवादात 'स्त्री'च्या श्रमप्रतिष्ठेवर.. कुण्या एकीच्या तरी कष्टाची होईल किंमत म्हणून म्हंटल,  "हरकत नाही" मला रडवत होता तुझा अबोला, जेव्हा प्रकाशित होतं होत  'स्त्री-पुरुष संवादावर'तुझं पुस्तक.. कुणा एका नात्यात तरी बोलका होईल वाद म्हणून म्हंटल, "हरकत नाही" मला वेध लागले होते शृंगाराचे, जेव्हा तू देत होतास बौद्धिक 'स्त्रीच्या भावनांची'व्हावी कदर.. कुण्यातरी 'ती'च्या तरी नजरेला मिळेल होकार म्हणून म्हंटल, "हरकत नाही" धूळ खात होत्या माझ्या पदव्या, जेव्हा तू अभिमानाने वाचली बातमी  'अर्थशास्त्रातल्या स्त्री'च्या योगदानाची.. एकीच्यातरी प्रमाणपत्राला मिळेल रोजगार म्हणून म्हंटल, "हरकत नाही" मी घेतंच होते गोळ्यांवर गोळ्या, जेव्हा तू आग्रही राहिलास तुझ्या बहिणीने दोघींवरच थांबावं.. त्यांच्या तरी वाट्याला येऊ नये माझ्या कळा म्हणून म्हंटल, "हरकत नाही" मी घरात होत गेले बंदिस्त, जेव्ह...

दीप पुजा

                               🌹दीप पुजा 🌹 कितीही गडद अंध:कार असला तरी सु्र्याच्या उदयाने अंधार नाहीसा होतोै.  सुर्या इतका प्रकाशमान जरी नसलातरी एक छोटासा मिणमिणत्या दिव्यात सुध्दा अंधार मिटविण्याची शक्ति असते.     आपल्या शेतीप्रधान देशात  उन्हाळ्यापासुन शेतीची तयारी सुरु होते.आषाढात पिके चांगलीच रुजतात, सगळीकडे गवत पसरलेले असते. आपली घरे शेतात असायची, बाजुला मोकळी जमीन ह्या दिवसात दिसत नसे. आजुबाजुची व शेतातील बीळे पावसामुळे बुजलेली असतात.गवत वाढलेले असते.ह्या गवतात वावरणारी सरपटणारे प्राणी जसे साप , गोम आपल्याला  दिसत नाही, चुकिने पाय पडला तर स्वसंरक्षणासाठी ते प्राणी चावतात. आषाढातील पावसाच्या झडीमुळे दिनकराचे दर्शनही  क्वचित होते.(अर्थात हल्ली पावसाचे प्रमाण कमी झाल्याने आठवडाभर सुर्य दर्शन नाही असे फार कमी वेळा होते)प्रकाशाची प्रखरता कमी झालेली असते.  त्याकाळी विज नव्हती, ‘दाबले बटन की सर्वत्र प्रकाश ‘ अशी स्थिती नव्हती.त्यामुळे दिवे तयार हवे.कारण घरात दे...

गटारी नव्हे दीप अमावस्या !

दीप अमावस्या मकरंद करंदीकर यांची पोस्ट शेअर करतेय. गटारी नव्हे दीप अमावस्या ! ( हिंदूंच्या  मंगलपूजेचे गटारीकरण नको ) येत्या सोमवारी २० जुलै रोजी दीप अमावस्या आहे. हिंदूंच्या सर्वाधिक कुचेष्टेचे, विकृत विनोदांचे  जे सण आहेत त्यात वटपौर्णिमेनंतर दीप अमावस्या हा सण येतो. सण साजरे करताना आधी आपणच त्यात अनेक विकृती येऊ देतो आणि नंतर     “ आम्हाला आमचे सण साजरे करू द्या “ म्हणून न्यायालयाच्या दारात जातो. म्हणूनच दिव्यांच्या या अस्सल मंगल मराठी सणाला आपण गटारात नेण्याचे पाप करू नये असे मला वाटते. व्यक्तिगत पातळीवर गटारी साजरी करण्याचा प्रत्येकाला हक्क आहे. पण दीपपुजेऐवजी केवळ गटारी म्हणून याला वृत्तवाहिन्या, वृत्तपत्रे, SMS, फेसबुक, whatsapp इत्यादींवर कुप्रसिद्धी मिळू नये.  दारूच्या बाटल्या, कोंबड्या, बोकड यांची चित्रे " शुभेच्छा म्हणून एकमेकांना पाठविणे, Happy Gatari म्हणून wish करणे या वाईट गोष्टी आपण कटाक्षाने टाळाव्यात. जो आपला सणच नाहीये त्यासाठी आपण आपला धर्म का म्हणून बदनाम करायचा ? उलट महाराष्ट्रातील सर्व जातींच्या लाखो घरांमध्ये मोठ्या भक्तिभावाने या दि...

*'जागतिक विद्युत सुरक्षा दिन' अर्थात 'दीप अमावस्या*

श्रीराम उद्या 'दीपअमावस्या', त्याबद्दल विशेष लेख प्रसारीत करीत आहे. ०९.०८.२०१८ *'जागतिक विद्युत सुरक्षा दिन' अर्थात 'दीप अमावस्या*  उद्या आषाढ महिन्याची अमावस्या !!!  या अमावस्येलाच 'दिव्याची आवस' किंवा 'दीप अमावस्या' असे म्हटले जाते. या दिवशी सुवासिनी स्त्रिया घरातले दिवे घासून-पुसून एकत्र मांडतात. त्याच्याभोवती रांगोळ्या काढतात व ते दिवे प्रज्ज्वलीत करुन त्यांची पूजा केली जाते. पूजेमध्ये पक्वान्नांचा महानैवैद्य दाखविला जातो. त्यावेळी पुढील मंत्राने दिव्याची प्रार्थना करतात. ‘‘दीप सूर्याग्निरुपस्त्वं तेजसां तेज उत्तमम्‌। गृहाण मत्कृतां पूजां सर्वकामप्रदो भव॥" भावार्थ:- ‘‘हे दीपा, तू सूर्यरुप व अग्निरुप आहेस. तेजामध्ये तू उत्तम तेज आहेस. माझ्या पूजेचा तू स्वीकार कर आणि माझ्या सर्व इच्छा पूर्ण कर.’’  कथा कहाण्या नेहमीच रम्य असतात. जनमानस सुद्धा कथा ऐकण्यास उत्सुक असते. *ज्याप्रमाणे मधाचे बोट लावून आई कडू औषध पाजते, अगदी त्याच मायेने आपल्या पूर्वसूरींनी जनमानसाचा अभ्यास करुन प्रत्येक आध्यात्मिक (खरंतर वैज्ञानिक) तत्व सामान्य मनुष्याच्या जीवनाचा अव...