Skip to main content

Posts

Showing posts from July 1, 2020

आषाढी_एकादशी निमित्ताने आपण या दिवसाशी निगडित धार्मिक महत्व असलेल्या वृक्षांची माहिती.

आज '#आषाढी_एकादशी' आजच्या दिवसाचे धार्मिक महत्व महाराष्ट्रात कोणाला सांगायची गरज नाही. या दिवसाच्या निमित्ताने आपण या दिवसाशी निगडित धार्मिक महत्व असलेल्या वृक्षांची माहिती करून घेऊ.          संतशिरोमणी ज्ञानदेवांनी सुमारे सातशे वर्षांपूर्वी आळंदीला संजीवनी समाधी घेतली. असे म्हणतात की, त्यावेळी त्यांनी हातातला दंड [ काठी ] मातीमध्ये रोवला आणि ते समाधी विवरामध्ये गेले. त्या दंडाने मूळ धरले आणि त्याला पालवी फुटून कालांतराने त्याचा वृक्ष झाला. तोच हा #अजानवृक्ष ! संत नामदेव म्हणतात -                                                              अजानवृक्ष आरोग्य अपार समाधीसमोर स्थापियेला I कोरडया काष्ठी फुटीयेला पाला  तेव्हा अवघीयाला नमस्कारी II                   संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माउलींच्या समाधीस्थानी असलेला अत्यंत पूज्य आणि पावन समजला जाणारा अजानवृक्ष जन...