Skip to main content

Posts

Showing posts from May 11, 2017

अपेक्षा

*"अपेक्षा "* आज आईचा रागरंग जरा वेगळाच भासला, तिने बाळाला जवळ बोलावले व गप्पा मारता मारता सहज प्रश्न विचारला, "बेटा मला सांग, कसे रे फेडशील पांग या माउलीच्या कष्टाचे?  तुला जन्म देताना मरण यातना भोगल्या, तुला वाढविताना रात्रींचा सुध्दा दिवस केला. तुझ आजारपण, पडण, रडण, दुखण, भरवणं, शिकवण काय काय नाही केल. स्वत:च जगणंच विसरले मी." मुलगा म्हणाला, "आता लवकरच मी मस्त पैकी नोकरी करेन, भरपूर पैसा कमवेन व जगातील सर्व सुख तुझ्या पायी ठेवेन." आई स्मितहास्य करित म्हणाली, " अरे वेडया हे तर सर्व माझ्यासाठी तुझे बाबा करत आहेत की, अन् हो, तू जेव्हा खूप मोठा होशील, रग्गड पैसा कमावशील, तेव्हा  ऐहिक सुखाची गरजच नसेल मला." मुलगा म्हणाला,"बर मग मी एका छानश्या प्रेमळ मुलीशी लग्न करेन, ती तुझी मनापासून सेवा करेल व तू आराम कर" आई आता हसली म्हणाली, "सुने कडून सेवा करुन घेण्याची माझी मुळीच ईच्छा नाही, मला नाही वाटत ते कर्तव्य तिचे आहे, माझ्या सुखासाठी तिने का कष्ट घ्यावे. तू लग्न कराव ते तुला आयुष्यासाठी साथीदार, जोडीदार मिळावा म्हणून, तुम्ही दोघांनी एकमेक...