|| *शरीरी वसे रामायण* || जाणतो ना कांही आपण शरीरी आपुल्या वसे रामायण || धृ || आत्मा म्हणजे रामच केवळ, मन म्हणजे हो सीता निर्मळ ! जागरुकता हा तर लक्ष्मण, शरीरी आपुल्या वसे रामायण ||१|| श्वास, प्राण हा मारुतराया, फिरतो जगवित आपुली काया | या आत्म्याचे करीतो रक्षण शरीरी आपुल्या वसे रामायण ||२|| नील जाम्बुवंत रक्त नसा या, फिरती शोधत जनक तनया गर्वच म्हणजे असतो रावण शरीरी आपुल्या वसे रामायण ||३|| रक्त पेशी त्या सुग्रीव, वानर, भाव भावना त्यातील वावर मोहांधता करी आरोग्य भक्षण शरीरी आपुल्या वसे रामायण ||४|| नखें केंस त्वचा शरीरावरती, शरीर नगरीचे रक्षण करती बंधु खरे हे करती राखण शरीरी आपुल्या वसे रामायण ||५|| क्रोध म्हणजे कुंभकर्ण तो, शांत असता घोरत पडतो डिवचताच त्या करी रणक्रंदन शरीरी आपुल्या वसे रामायण ||६|| गर्वे हरले सौख्य मनाचे कांसाविस हो जीवन आमुचे संकटी येई शरीर एकवटून शरीरी आपुल्या वसे रामायण ||७|| मनन करता भगवंताचे, रक्षण होईल आरोग्याचे राम जपाचे अखंड चिंतन शरीरी आपुल्या वसे रामायण ||८|| || *श्रीरामार्पणमस्तु* ||🙏🏻
Advaya the ultimate truth, is Anant..... unlimited, infinite, boundless.... Let's join hands and bring the best out of this undepletable human resource. Let us spread the light and delight every soul, while we are here and commit ourselves to mind, body and soul development of one and all. Note: This blog was previously named as 'This is Life', however, after a lot of thought, this name has been changed to 'Advaya Anant'.