Skip to main content

Posts

Showing posts with the label *'जागतिक विद्युत सुरक्षा दिन' अर्थात 'दीप अमावस्या*

*'जागतिक विद्युत सुरक्षा दिन' अर्थात 'दीप अमावस्या*

श्रीराम उद्या 'दीपअमावस्या', त्याबद्दल विशेष लेख प्रसारीत करीत आहे. ०९.०८.२०१८ *'जागतिक विद्युत सुरक्षा दिन' अर्थात 'दीप अमावस्या*  उद्या आषाढ महिन्याची अमावस्या !!!  या अमावस्येलाच 'दिव्याची आवस' किंवा 'दीप अमावस्या' असे म्हटले जाते. या दिवशी सुवासिनी स्त्रिया घरातले दिवे घासून-पुसून एकत्र मांडतात. त्याच्याभोवती रांगोळ्या काढतात व ते दिवे प्रज्ज्वलीत करुन त्यांची पूजा केली जाते. पूजेमध्ये पक्वान्नांचा महानैवैद्य दाखविला जातो. त्यावेळी पुढील मंत्राने दिव्याची प्रार्थना करतात. ‘‘दीप सूर्याग्निरुपस्त्वं तेजसां तेज उत्तमम्‌। गृहाण मत्कृतां पूजां सर्वकामप्रदो भव॥" भावार्थ:- ‘‘हे दीपा, तू सूर्यरुप व अग्निरुप आहेस. तेजामध्ये तू उत्तम तेज आहेस. माझ्या पूजेचा तू स्वीकार कर आणि माझ्या सर्व इच्छा पूर्ण कर.’’  कथा कहाण्या नेहमीच रम्य असतात. जनमानस सुद्धा कथा ऐकण्यास उत्सुक असते. *ज्याप्रमाणे मधाचे बोट लावून आई कडू औषध पाजते, अगदी त्याच मायेने आपल्या पूर्वसूरींनी जनमानसाचा अभ्यास करुन प्रत्येक आध्यात्मिक (खरंतर वैज्ञानिक) तत्व सामान्य मनुष्याच्या जीवनाचा अव...