Skip to main content

Posts

Showing posts from May 18, 2017

आतातरी बाई जगायला शीक..

Courtsey Adv. Nilima Kanetkar, mother of Urmila Kothare Dedicated to all wonderful woman that you are 😊🤓 प्रत्येक स्त्रीने शिकावं असं काही.....आता खूप झालं, बास झालं थकले आता म्हणायला शीक केलं तेव्हढं पुरे झालं आता थोडं थांबायला शीक नाती गोती कुटुंब कबिला बाजूला जरा ठेवायला शीक इतरांसाठी आयुष्य वेचलं स्वतःसाठी जगायला शीक विसरून रोजची कामं खुशाल उशिरापर्यंत लोळायला शीक संसाराचं ओझं आपलं  थोडं share करायला शीक कसं होईल, काय होईल चिंता सर्व टाकायला शीक माझ्याविना घर हे चालेल असा विश्वास ठेवायला शीक जॉब, घर, मुलं आणि बिलं यांची कसरत विसरायला शीक Superwoman व्हायचं सोडून दमानं जरा जगायला शीक घड्याळाची endless टिकटिक दुर्लक्षित तू करायला शीक उठल्यापासून झोपेपर्यंतच्या कामाचे हिशोब विसरायला शीक आपल्या उरावर घेतलेली कामं आतातरी टाकायला शीक गेलं उडत काम म्हणून निवांत पुस्तक वाचायला शीक पाय पसरून, पेपर धरून चहाचे घोट घ्यायला शीक Calorie count विसरून जरा आयतं food मागवायला शीक याचं जेवण त्याचा डबा कपडे याचे नि औषध काढा घर पसारा भाजी पाला सगळं सगळं सोडायला शीक कोणासाठी न थांबता Steering हाती धरा