Skip to main content

Posts

Showing posts from December 12, 2017

Conquering the demons

मुलुंड ला आम्ही, P & T (पोस्ट अँड टेलिग्राफ्स ) च्या कॉलनी मध्ये 8 वर्ष राहिलो। आमचा 5 मजल्यावर फ्लॅट होता। त्या काळी 82- 89, तुरळक वस्ती असल्यामुळे, 5 व्या माजलहूनही लांब पर्यंत सृष्टीसौंदर्य दिसायचे। माझ्या खोली च्या खिडकीतून डोंगर दिसायचे। माझा अभ्यासाचा table मी त्याच दिशेने ठेवला होता। मधून मधून बाहेरच्या हिरवळी आणि डोंगरा कडे पाहत अभ्यास व पुढील आयुष्याची स्वप्ने पाहण्यात 8 वर्ष निघून गेले। अनेक पाहुणे आलेत आणि राहिलेत पण। पण त्यातील एक मावस भाऊ खूप उत्साही, त्याने डोंगर चढून जाण्याचा प्लॅन केला, पण मला वगळले 😟, मी चढून जाऊ शकीन याची खात्री नव्हती त्याला..आयुष्यात, अनेक असे remarks ऐकायला मिळतात आणि न कळत आपण त्या वाटे चा विचार सोडून देतो...  पण ते डोंगर मला कायम खुणावत असत, बोलावत असत, माझे त्यांच्याशी अनेक वर्षाचे हितगुज होते, त्यांना मी कधीच विसरू शकत नव्हते.. आणि मग अचानक परत त्यानी निरोप धाडला। भेटायला ये म्हणून.. वय झाले तर काय.. मनाची उभारी तर आहे न.. मी हो म्हटले.. घरून परवानगी पण मिळाली आणि बस गेले मध्य रात्री उठून। सुर्योदयापूर्वी चा साधारण पहाटे चे 4 झाले असतील..