Skip to main content

Posts

Showing posts from April 6, 2017

अविरत ओठी यावे नाव....

31/03/17, 6:53 PM - Messages you send to this group are now secured with end-to-end encryption. Tap for more info. 04/04/17, 6:56 PM - Suhas Dhamorikar: अविरत ओठी यावे नाम श्रीराम जय राम जयजय राम रामनाम हे सदा सुखाचे निधान जाणा परमेशाचे पतीतपावन अवघे नाम श्रीराम जय राम जयजय राम जानकीची जणु जीवनज्योती प्रभु रामाची कोमल मूर्ती मंगल दर्शन पूर्ण विराम श्रीराम जय राम जयजय राम पंचप्राण हे पवनसूताचे राम जणू नि:श्वास तयांचे तनू संजीवन सुंदर धाम श्रीराम जय राम जयजय राम गीत - मनोहर कवीश्वर शुभप्रभात/Good morning ✨✨✨☀✨✨✨ 🌳⛳🌳🌺🌳⛳🌳 05/04/17, 2:40 AM - Maya Pande Londhe SHS: ======= माय - लेक ======= रात्रीचे साडेअकरा वाजून गेले होते. अंथरूणाला पाठ टेकणार, इतक्यात एकाएकी लक्षात आलं की आपण गडबड करून ठेवलीये. ऊद्या पहाटे ऊठून डबा करायचाय आणि कणिक भिजवायची राहिलीये. स्वत:वरच चरफडत बाहेर आले. स्वैपाकघरातली माझी खुडबुड ऐकून अभ्यास करत बसलेला मुलगा आत आला. - हे काय? आत्ता काय करतीयेस ? झोपायला गेली होतीस ना? - अरे, पहाटे डबा द्यायचाय अन् मी कणिकच भिजवायला विसरले. आजकाल ना मी काय काय विसरेन काही सांग...