Skip to main content

Posts

Showing posts from July 15, 2020

वेडी माणसे

वलयांकित... वेडी माणसे..! 🌹 कोणी रायगडचा, कोणी तिरंग्याचा वेडा. ..करा थोडा वेडेपणा ! रायगड १००० वेळा चढून जायचा पण कोणी करेल का.? पण श्री. सुरेश वाडकरांनी  तो केला आणि आतापर्यंत साधारणपणे ९०० वेळा ते रायगड चढले आहेत. सोबत अनेकांना घेऊन जातात आणि गड चढताना गडावरच्या पक्षांसारखा आवाजही काढतात.तो आवाज ऐकून पक्षी त्यांना प्रतिसाद देतात. गडावर गेल्यावर प्रत्येक स्थानाची, बुरुजाची माहिती सांगतात.  ह्या व्यवहारी जगात काही अशी माणसे दिसतात की त्यांनी चालवलेलं काम पाहून त्यांना वेड लागलं असावं असे वाटते. ही माणसं अशा कामात गढून गेलेली असतात ज्यातून त्यांना स्वतःला काहीच मिळत नाही. उलट पाहणाऱ्यांच्या विचित्र नजरा सहन कराव्या लागतात. तरीही कोणीतरी आज्ञा दिली आहे अशा थाटात ते आपलं काम करत राहतात.  एक  जेधे नावाच्या तरुण आहे. .. हा तरुण २७ जानेवारी आणि १६ ऑगस्टला एक गोणी घेऊन बाहेर पडतो आणि रस्त्यात पडलेले झेंडे, तिरंगी बिल्ले गोळा करतो. सायंकाळपर्यंत जमेल तितकं चालत जातो. शेवटी गोणी भरते. त्या गोणीला एक हार घालतो, नमस्कार करतो आणि ती डम्पिंग ग्राउंडवाल्यांच्या ताब्यात देऊन येतो. हे सगळं कशासाठी त