Skip to main content

Posts

Showing posts from June 9, 2017

#चिवड्याचे_थालीपीठ#

  या पदार्थासाठी घरी जवळपास 10/15 दिवस जुना आणि कुणी खात नसल्याने दीनवाणे कटाक्ष फेकत असलेला चिवडा हवा. आधी या चिवडा संपावा म्हणून घरातल्यांना आग्रह करून त्यांची बोलणी खाल्लेली असावी म्हणजे आई तुला खपवाखपवी करायला आम्हीच लागतो का असे मुलांनी म्हणायला हवे. ए तुझे चिवडा पूराण बस कर बाई तु खा मला नको असे नवर्याने पण म्हणायला हवे. मग मी तरी तुला का खाऊ असे दुर्लक्ष आपण पण करायला हवे. असे काही घडले की चिवड्याची खूमारी अधिक वाढते. तर असा चिवडा खसकन डबा ओढुन वसकन  मिक्सरच्या भांड्यात ओतावा. खर्रकन मिक्सरचा कान पिळुन चिवड्यातले दाणे  कढीपत्ताा डाळे मिरच्या या सह तो मिक्सरमधून बारीक दळावा. परातीत घेऊन त्यात वाटीभर बेसन व वाटीभर कणीक बचकभर तिखट चिमूटभर हळद चवीनुसार मीठ कचाकचा कापलेला कांदा घालून वचकटपणे मिसळावे. शेतकर्यांच्या संपामुळे 20 रू ला 20 काड्या मिळालेल्या कोथिंबिरीच्या काड्यातल्या 5/6 काड्या ओढून कराकरा चिरून त्यात घालाव्यात.  पाणी घालून लेकराला जितक्या मायेने गोंजारतो तसे गोंजारून गोळा मळावा.  धपकन तवा ठेऊन त्यावर सर्रकन तेल ओतावे. मग थालिपीठाचा गोळा त्यावर ठेवून नवर्याने सांगितलेली भा...