Skip to main content

Posts

Showing posts from June 20, 2020

‘श्यामची आई’ च्या मागचे आचार्य अत्रे

साने गुरुजी यांनी 'श्यामची आई' च्या रूपाने संस्कारांचा अनमोल ठेवा लिहून ठेवला . काही पिढय़ा या पुस्तकाने संस्कारक्षम झाल्या. पुढे याच नावाने आचार्य अत्रे यांनी  चित्रपट काढला. अतिशय विलक्षणपणे त्यांनी चित्रपटासाठी प्रसंग निवडले. हसत्या खेळत्या अशा प्रसन्न वातावरणामधून त्यांनी हळुवारपणे प्रेक्षकांना शोकात्म वातावरणामध्ये नेले आणि तिथेच आपली पकड घट्ट करून मध्यंतरानंतरचा चित्रपट थेट मेलोड्रामाच्या दिशेने नेताना ते अजिबात कचरले नाहीत. ६ मार्च २०२० रोजी या चित्रपटास ६० वर्षे होतील. या निमित्ताने या चित्रपटात श्यामची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्याने जागवलेल्या आठवणी.. १९५३ मध्ये 'श्यामची आई'चे चित्रीकरण पूर्ण होऊन चित्रपट प्रकाशित झाला आणि त्या पाठोपाठ मला 'वहिनीच्या बांगडय़ा' या चित्रपटात भूमिका मिळाली. त्या चित्रपटाचेही चित्रीकरण मुंबईतच असायचे. 'श्यामची आई'ला सुरुवातीला फारसा प्रतिसाद मिळाला नाही आणि आचार्य अत्रे काळजीत पडले. कर्ज काढून त्यांनी चित्रपटाची निर्मिती केली होती! आता काय करायचे? आणि एक दिवस मुंबईतच मला निरोप आला, की 'श्यामची आईच्या निमित्ताने गि