Skip to main content

Posts

Showing posts from April 10, 2021

शोध बाजीराव-मस्तानीपुत्र, पानिपतवीर समशेर बहादूर यांच्या कबरीचा

*शोध बाजीराव-मस्तानीपुत्र, पानिपतवीर समशेर बहादूर यांच्या कबरीचा*     पानिपत!हिंदुस्थानच्या रक्षणासाठी लाखभर मराठ्यांनी प्राणाहुती दिलेले स्थान! मध्ययुगीन भारतातील सर्वात मोठे युध्द,महायुद्धच! मराठ्यांच्या प्रखर राष्ट्रीय भावनेचा धगधगता अविष्कार! मराठ्यांनी हारूनही जिंकलेले युध्द!       या प्रचंड रणसंग्रामात अनेक प्रसिद्ध, अप्रसिद्ध मराठी सरदारांच्या, वीरांच्या समवेत लढले होते पेशवे बाजीराव आणि मस्तानी यांचे पुत्र समशेर बहादूर. प्राणांतिक जखमांनी घायाळ झालेल्या समशेर बहादूरांनी अखेरचा श्वास घेतला तो भरतपूरमधे.याच समशेर बहादूरांच्या कबरीचा शोध मला कसा लागला त्याची हकीकत या लेखात नमूद करीत आहे.      महाराष्ट्रातील आणि इतरही राज्यातील शिवरायांचे किल्ले पाहण्याच्या प्राथमिक उद्देशाने  १९९० मधे सुरु झालेली माझी दुर्गदर्शन यात्रा पुढे खूप विस्तारत गेली.इतिहास घडविणाऱ्या मराठी वीरांच्या समाधीस्थळांचे दर्शन आणि शोध हा महत्वाचा विषय या यात्रेत समाविष्ट झाला.२००६ पर्यंत जवळपास तीनशे किल्ले पाहिले आणि शंभराहून अधिक महत्वाच्या मराठी वीरांच्या समाधीस्थळांचे दर्शन घडले.यातील बहुतांश समाधीस्थळे २००६