Skip to main content

Posts

Showing posts from June 27, 2020

पाना पानांचा राखा मान

तुळशीचे पान - विष्णूपदी स्थान.. बेलाचे पान - शंकरचा मान.. केवड्याचे पान - नागाचे स्थान.. रुईचे पान - मारुतीची शान.. केळीचे पान - भोजनाशी छान .. नागवेलीचे पान - गोविंदविड्याला छान.. मेंदीचे पान - शकुनाचा मान.. पळसवडाचे पान- द्रोणपत्रावळी छान.. पिंपळाचे पान - मुंजाचे स्थान.. गुलाबाचे पान - काटेरी छान.. कढीपत्त्याचे पान - फोडणीत स्थान.. आळूचे पान - अळूवडीला छान.. तमालपत्राचे पान - मसाल्याची शान.. वहीचे पान - लिहायला छान.. पुस्तकाचे पान - माहितीची खाण.. गवताचे पान - दवबिंदू शोभायमान.. ओव्याचे पान - सुवासिक छान..त्याला भजीत - मान.. तुळशीचे पान - स्मरणिशक्तीला महान.. कोरफडीच पान - त्वचेला छान... आपट्याचे पान-त्याला सुवर्णांचा मान.. आंब्याचे पान - तोरणाची शान..त्याला शुभ कार्यांत - मान🌱 🌿पाना पानांचा राखा मान पाना पानांची जगवा शान🌿🌳🌴🌳🌴🌳🌴 झाडे लावा झाडे जगवा  🤗😇🌲🌱⚘🌿🌾 -Ashutosh

MY SOUL HAS A HAT

 Beautiful poem by Mario de Andrade (San Paolo 1893-1945) Poet, novelist, essayist and musicologist. One of the founders of Brazilian modernism. __________________________ MY SOUL HAS A HAT I counted my years  & realized that I have Less time to live by,  Than I have lived so far. I feel like a child who won a pack of candies: at first he ate them with pleasure  But when he realized that there was little left, he began to taste them intensely. I have no time for endless meetings where the statutes, rules, procedures & internal regulations are discussed,  knowing that nothing will be done. I no longer have the patience  To stand absurd people who, despite their chronological age,  have not grown up. My time is too short:  I want the essence,  my spirit is in a hurry.  I do not have much candy In the package anymore. I want to live next to humans,  very realistic people who know How to laugh at their mistakes, Who are not inflated by their own triumphs  & who take responsibil

वृद्ध आई वडिल

वृद्ध आई वडिलांना सारखा फोन कशासाठी करायचा ?  बाबा मला दर एक दोन दिवसाआड रात्री आठ साडेआठला फोन करतात. मी ऑफिसमधून येऊन स्वैपाकघरात असते. रात्रीचे जेवण, मागचे आवरणे, मुलाची सकाळची शाळा, त्याच्या डब्याची तयारी, दुस-या दिवशीचे ऑफिस, आमचे डबे हे सगळं ओळीने डोळ्यासमोर दिसत असतं. हातातले काम टाकून फोन घ्यायचा म्हणजे कपाळावर आठी उमटतेच. एकीकडे अपराध्यासारखंसुद्धा वाटतं. त्यांचे बोलून झाले की आईला बोलायचे असते. रोज रोज नवीन तरी काय बोलणार ? मी कानाला मोबाईल लावून, खांदा उंच करून तो पकडून एकीकडे कामे उरकत असते. माझा दादा अमेरिकेत जाऊन तिथलाच होऊन गेला. मी ठाण्याला असते. आणि पुण्यात दोन बेडरुमच्या प्रशस्त फ्लॅटमध्ये सत्तरी ओलांडलेले माझे आईबाबा रहातात. आईच्या भाषेत empty nesters. त्यांना सांगितले, इथे ठाण्यात फ्लॅट घ्या. पण पुणेकर असल्याचा जाज्वल्य अभिमान बाळगणाऱ्या आईबाबांना ते नाही पटत. (हो. मीसुद्धा पुण्याची माहेरवाशिण म्हणून तोरा मिरवतेच की.)  आज हा विचार मनात येताच मला गंमत वाटली. ठरवले, आज सरप्राईज देऊ या. घरी आल्यावर फ्रेश होऊन बाबांना फोन लावला. "बाबा" "काय झालं ग ?"

बाबा ...

हाफ चड्डीत सायकलच्या पुढच्या दांडीवर एका बाजूला दोन पाय टाकून तिरका बसायचो आणि बाबा अंगातला सगळा जोर लावून पायडल मारत सायकल पुढे न्यायचे. त्यावेळी मला फक्त सायकलला झूम करून येणारा वेगच समजायचा आणि मन सुखावून जायचं.. त्यामागे बाबांनी दातओठ खाऊन लावलेला तो जोर कधी जाणवलाच नाही! संसाराचा सगळा गाडा त्यांनी आणि आईनी असाच जोर लावून पुढे नेला. मला समजला तो माझ्या आयुष्याला मिळत राहिलेला वेग... समजली ती फक्त माझी होत असलेली प्रगती - शारीरिक वाढीतली, खेळातली, स्पर्धांमधली, शिक्षणातली, व्यवहारज्ञानातली... आणि मी अभिमानानं सुखावत गेलो... त्यामागे आई-बाबांनी लावलेला जोर त्यांनी कुठून आणि कसा आणला हे समजलंच नाही. ते वयच नव्हतं बहुदा, हे असलं काही समजून घेण्याचं. पण कालचक्राला सगळं समजतही असतं आणि उमजतही! प्रत्येक गोष्टीत बाबांना गृहीत धरणारा, ते आहेत, ते बघतील, ते करतील असं म्हणणारा मी अलगद स्वतः बाबांच्या भूमिकेत कधी शिरलो समजलंच नाही. तेव्हा आम्ही गणपती बाप्पा आणायला जायचो. ही मूर्ती घेऊ की ती घेऊ असं व्हायचं. वेगवेगळ्या मूर्ती बघत असताना त्यातून आपल्या घरी कुठली न्यायची याची निवड माझं 'वय

वयानुसार आपण काय काय .. गोष्टी सोडल्या

वयानुसार आपण काय काय .. गोष्टी सोडल्या.. *आपण गाभुळलेली चिंच ..* *अनेक वर्षात खाल्लेली नाही* *जत्रेत मिळणारी ..* *पत्र्याची शिट्टी ..* *वाजवलेली नाही.* *चटक्यांच्या बिया घासून ..* *चटके द्यावेत ..* *असं आता वाटत नाही* *सर्कसमधला जोकर आपलं ...* *मन आता रिझवू शकत नाही.* *तसंच कापसाची म्हातारी ..* *पकडण्याचा चार्मही ..* *राहिलेला नाही..* *कारण ..* : *कापसाच्या म्हातारीने ..* *उडता उडता आपला ..* *बालपणीचा काळ सुखाचा..* *स्वत:बरोबर कधी नेला ..* *ते आपल्याला कळलंच नाही.* *आता त्या सहली नाहीत...* *दोन दोन मुलांच्या ..* *जोड्या करून ..* *चालणं नाही..* *विटी दांडू नाही...* *गोट्या*लगोरी* *साबणाचे फुगे नाहीत..* *प्रवासात बोगदा आला तर ..* *एक अनामिक हुरहूर नाही..* *त्या उडणाऱ्या म्हातारीने ..* *हे सगळे आनंद नेले...* *त्याच्या बदली ..* *तिचं वार्धक्य तिने ..* *आपल्याला दिलं...* *म्हणूनच ती अजून उडू शकते...* *आणि आपण जमिनीवरच आहोत.* *लाटेने की काळाने ...* *नेला तो मातीचा किल्ला?* *भोवऱ्याच्या रश्शीला लावलेला कोल्डड्रिंकच्या झाकणाचा बिल्ला…* *हरवली कुठेतरी ती शाळेतली मूल्यशिक्षणाची वही,* *इवलुश्या

खाद्यजत्रा

खाद्यजत्रा वऱ्हाडी ठसका गरमागरम झणझणीत चना पोहे, पाटोडी, पाटोडीची रस्सा भाजी, गोळा भात, वडा भात हे खमंग वऱ्हाडी पदार्थ आपल्याला माहीत असले तरी नागपूरची खरी ओळख आहे ती सावजीच्या झणझणीत, मसालेदार पदार्थासाठीच.. असे म्हणतात की माणूस जसा खातो तसा बनतो.. त्याबरोबरच लहानपणच्या खाण्या-पिण्याच्या सवयी माणसाला आयुष्यभर साथ देतात आणि घडवतात. तसेच भौगोलिकतेचापण माणसाच्या खाण्यापिण्याच्या सवयींवर नक्कीच परिणाम होतो. नागपूर असं शहर जिथे तिन्ही ऋतू अतिशय विषम. पावसाळ्यात इथे पाऊस मुसळधार नाहीतर कोसळधार असतो. थंडी बोचरी आणि हाडं गोठवणारी. उन्हाळा दरवर्षी उष्माघाताच्या बळींची संख्या नोंदवणारा खतरनाक. या सर्व गोष्टींचा इथे राहणाऱ्या माणसांवर व त्यांच्या खाण्यापिण्याच्या सवयींवर परिणाम झाला नाही तरच नवल. चला एक फेरफटका मारूया या विलक्षण शहराच्या खाद्यसंस्कृतीचा... नागपूरची खाद्यसंस्कृती पहाटे पाचपासूनच सुरू होते. ती चना-पोहे या डिशपासून. नागपूर रेल्वे स्टेशनपासून अगदी पायी जाण्याच्या अंतरावर आहे कस्तुरचंद पार्क. याच पार्कने मागील एक शतकापासून भारतातील सर्व थोर पुढाऱ्यांच्या सभा अनुभवल्या ओहत. कस्तुरचंद

मऊभात, तूप, मेतकुट

मऊभात, तूप, मेतकुट... स्टेप बाय स्टेप... चित्पावनी न्याहारी.... एका रम्य, रिकामटेकड्या सकाळी पितळी पातेल्यात भरपूर पाणी खळखळून उकळले की त्यात धुतलेले तांदूळ वैरावेत. तांदुळ रटरटत (आवाजाशी अगदी साधर्म्य हवंच बरं का) बोटचेपं शित शिजलं की थोडावेळ झाकण ठेवावं, गॅस बंद करु नये ... नंतर पुन्हा थोडं पाणी घालून भात गुरगुट्या होईल इतपत ढवळावा. मग चवीनुसार मीठ, मिरपुड आणि हिंग घालावे... हा उपक्रम पार पाडल्यावर एक पोह्याचा पापड खरपूस भाजून/तळून घ्यावा. मग एका स्वच्छ केळीच्या पानावर आधी तो पापड ठेवून त्यावर हा भात ओतावा (हा ओतावाच लागेल बरं का) त्यानंतर भाताच्या गरम वाफांनी आसमंत जादुई होत असतानाच त्यावर थोडी कडेने व नंतर भरपूर (मधे किंचित विहीर करुन) घरगुती खमंग तुपाची धार सोडावी (I mean ती देखील ओतावी) नंतर अस्सल खमंग मेतकुटाची उत्तम नक्षी संबंध भातावर मनसोक्त काढावी....पोह्याचा पापड, मऊभात, हिंग, मिरपुड, साजूक तूप आणि मेतकुट यांचा एक amazing aroma संबंध घरात दरवळायला सुरुवात होईल.... ...एव्हाना पोटातील वैश्वानर जागा व्हायला सुरुवात झालेली असते. रसना चहूबाजूंनी खवळलेली असते. बोटांची चाळवाचाळव सु

Ramrakha stotra - तरुणौ रुपसम्पनौ..

"तरुणौ रुपसम्पनौ सुकुमारौ महाबलौ । पुंडरीक विशालाक्षौ चीरकृष्णार्जिनाम्बरौ ।। फलमुलाशनौ दान्तौ तापसौ ब्रह्मचारिणौ । पुत्रौ दशरथस्यैतौ  भ्रातरौ रामलक्ष्मणौ ।।" हे दोन रामरक्षेतले श्लोक बहुतेकांना ठाऊक आहे. श्रीराम आणि लक्ष्मण यांचे नितांत सुंदर वर्णन करणारे हे श्लोक मूळ वाल्मिकी रामायणातले आहे. लक्ष्मणानी कान आणि नाक कापल्यावर शूर्पणखा त्याचा भाऊ खर याच्याकडे गेली आणि "तुझी ही अवस्था कोणी केली?" या त्याच्या प्रश्नावर शूर्पणखेनी "वनात आलेल्या दोन पुरुषांनी ही अवस्था केली" असे सांगितले , आणि त्या पुरुषांचे वर्णन करणारे हे दोन श्लोक शूर्पणखेच्या तोंडी महर्षी वाल्मिकी यांनी घातले आहे.  काल रात्री हे श्लोक रामायणात वाचताना मला विलक्षण आश्चर्य वाटले आणि महर्षींना अक्षरशः प्रणाम करावासा वाटला. अत्यंत जखमी आणि अपमानित अवस्थेत असलेल्या शूर्पणखेच्या तोंडी सुद्धा राम लक्ष्मणाचे अत्यंत चपखल वर्णन करणारे श्लोक त्यांनी टाकले, खरचं - प्रतिभेचा इतका सुंदर आविष्कार पाहून मन थक्क झाले.  रामरक्षा स्तोत्रात हे श्लोक घेण्याचे रचनाकार टाळू शकले नाही, हे एकप्रकारे आपल्या मूळ संस्

नाभी आणि सौंदर्य

कमी खर्चात घरगुती प्राचीन उपचार.विश्वास नाही बसणार,पण एक वेळ पंधरा दिवस करूनच पहा.मग खात्री होईल,विश्वास बसेल. गुडघेदुखी , सर्दीपडसे तसेच त्वचाविकार. यामुळे त्रस्त असाल तर रात्री झोपण्यापूर्वी बेंबीजवळ वेगवेगळ्या तेलांपैकी विशिष्ट तेल लावून झोपले तर अक्षरशः चमत्कारीक फायदे दिसतात. ही तेले नेहमी आपल्याकडे असतात. पण बेंबी मध्ये दोन तीन थेंब टाकून, बेंबीच्या जवळ फक्त दोन थेंब लावून झोपल्यास बरेच विकार चुटकीसरशी दूर होऊ शकतात. मात्र कोणत्या तेलामुळे कोणते रोग बरे होतात त्याची माहिती फारशी कुणाला नसते. त्यासाठीच हा प्रयत्न. 1) सांधेदुखी असेल, ओठ फाटले असतील तर सरसोंचे तेल घेऊन त्याचे दोन तीन थेंब बेंबीत टाकावेत,दोन थेंब बेंबीजवळ लावायचे. हा उपाय करताना थोडा चमत्कारीक वाटेल खरा, पण तो प्राचीन उपाय आहे. त्यामुळे सांधेदुखी आणि ओठ फाटणे कायमचे बरे होईल. 2) सर्दी-पडसे तर कधीही होते. काहीही केलं तरी सर्दी बरी होत नाही. पण अशावेळी कापसाचा बोळा अल्कोहोलमध्ये (homeopathy remedies)बुडवून तो आपल्या बेंबीजवळ फिरवायचा.सर्दीपडशावर हा रामबाण इलाज आहे. करून पहाच एकदा. जुन्यातील जुनी सर्दीही या लहानशा उपाया

"एवढे दे पांडुरंगा"

 सुरेश भटांची "एवढे दे पांडुरंगा!" हि कविता!!! मनात कुठेतरी जाणवेल कि, दान तर उदात्त असतेच पण "मागणे." देखील किती उदात्त असू शकते!! माझिया गीतात वेडे दु:ख संतांचे भिनावे; वाळल्या वेलीस माझ्या अमॄताचे फूल यावे ! आशयांच्या अंबरांनी टंच माझा शब्द व्हावा; कोरडा माझा उमाळा रोज माधुर्यात न्हावा ! स्पंदने ज्ञानेश्वराची माझिया वक्षांत व्हावी; इंद्रियांवाचून मीही इंद्रिये भोगून घ्यावी ! एकनाथाने मलाही बैसवावे पंगतीला; नामयाहाती बनावे हे जिणे गोपाळकाला ! माझियासाठी जगाचे रोज जाते घर्घरावे; मात्र मी सोशीन जे जे ते जनाईचे असावे ! मी तुक्याच्या लोचनांनी गांजल्यासाठी रडावे; चोख वेव्हारात मझ्या मी मला वाटून द्यावे ! ह्याविना काही नको रे एवढे दे पांडुरंगा ! ह्याचसाठी मांडीला हा मी तुझ्या दारात दंगा ! – सुरेश भट ( रंग माझा वेगळा )

भरती ओहोटी आणि तळण

 भरती ओहोटी आणि तळण भरती आणि ओहोटीचा स्वयंपाकावर परिणाम होतो का ? उत्तर आहे हो ! ऐकून जरा आश्चर्य वाटेल.... पण भरती ओहोटीचा आणि तळणाचा संबंध आहे. एखादं वर्षी दिवाळीत मोठ्या प्रमाणात चकल्या , अनारसे , शंकरपाळे केल्यावर ते पदार्थ आपण ज्या डब्यात ठेवतो त्याच्या तळाशी खूप सारे तेल जमते आणि ते पदार्थ ही मऊ होतात . तो पदार्थ करणारी व्यक्ती आणि पदार्थ बनवण्यासाठी लागणाऱ्या जिन्नसाचे प्रमाण ही तेच असते परंतु त्या पदार्थांत खूप तेल शोषले जाते. बटाटेवडे / भजी केलीे तर कधी कधी ते खूप तेल पितात. ह्याचे कारण आहे ते म्हणजे तो पदार्थ नेमका ओहोटीच्या वेळेत तळला गेलेला असतो. जर पदार्थ भरतीच्या वेळेत तळला गेला तर खूप कमी तेल लागते व पदार्थ ही छान होतो आणि आरोग्याच्या दृष्टीने ते चांगले असते. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की भरती ओहोटीची वेळ कशी काढावी ? ती खालील प्रमाणे वृत्तपत्रात किंवा नेटवर ती मिळतेच पण एक साधी आणि सोपी पद्धत खाली देत आहेत कालनिर्णयवर आजची तिथी बघावी उदारणार्थ आजची कृ. २ आहे तिथी कृ. २ × ३/४ = १.५ १.५ म्हणजे आत्ता दुपारी १.३० वाजता पूर्ण भरती आहे पूर्ण भरतीच्या साधारण 3 तास आधी तळण स

तुकडे अर्थात कुस्करा

पोळ्या उरल्या तर आपण दुसऱ्या दिवशी तुकडे अर्थात कुस्करा..नाही ना कळले अजून..अहो..आपली फोडणीची पोळी हो ..ही करतोच ना आपण. पण अलीकडेच माझी मुलगी रात्रीच्या, एक पदर्धी जेवणात, खमंग फोडणी ची पोळी कर ग आई? असे राजरोस म्हणते..नक्कीच तिला आपल्या महान परंपरेचे इतके चविष्ट प्रतिनिधित्व करणारा हा पदार्थ या फर्स्ट फूड आणि हर तऱ्हेचे हॉटेलात मिळणारे शाकाहारी पदर्धात कुठेही (चवीलाही) सापडला नसणार याची मला खात्री आहे. मीही हौशी ने मग, भरपूर कांदा मिरची कोथिंबीर घालून हळूवार केलेले ताज्या पोळीचे तुकडे कढईत मंद आचेवर वाफ येई पर्यंत ठेवते. हो आणि घाईघाईने नको ह. तब्येतीत केले तर काय लाजवाब लागतो हा पदार्थ.  मानाच्या पानात कुणी बसायचं यासाठी सर्व पदार्थांची स्पर्धा कायम सुरु असते. फोडणीची पोळी मात्र या स्पर्धेपासून अलिप्तच आहे. पण हिला कढईत हलविताना मला पण अनाहुत अश्या रम्य बालपणी च्या आठवणी येतात..माझी आजी नावा प्रमाणेच  *अन्नपूर्णा*. उन्हाळयात आम्ही सर्व १२ नातवंडे सुट्टी घालवायला एकत्र येत असू. नागपूरचा उन्हाळा आणि त्यात दिवसही मोठा..नातवांना सकाळ चा घरघुती नाश्ता असे..कधी सातूचे पीठ - दूध गुळात कालव

*ऊसाच्या मुलांची लग्न*

*ऊसाच्या मुलांची लग्न* *कुणी लिहिले आहे माहीत नाही पण खूप छान आहे वाचा सर्वानी एकदा* ऊसाला झाली दोन दोन पोरं, मोठा मुलगा *'गुळ'*अन्  धाकटी मुलगी *'साखर'*. साखर दिसायला गोरीगोमटी अन् सुंदर, गुळ मात्र ओबडधोबड अन् काळा कलुंदर. साखर तशी स्वभावाला गोड, तिच्यात उणेपणा शोधणं अवघड. गुळ मात्र स्वभावाला चिकट, समोर दिसला की ईतरांना वाटे संकट. साखर तशी मनमिळाऊ, जेथे जाई तेथे मिसळुन जाई, गुळ पण गेला ईतरात मिसळायला,पण त्याला ते जमलेच नाही. साखरेला गर्दीत शोधणे असे फार अवघड, गुळ मात्र गर्दीत लगेच दिसे, कारण तो होता 'ओबडधोबड'. साखरेचे रव्यावर प्रेम जडले, बापाने लगेच् दोघांचे लग्नच् लावुन टाकले. तीला झाला एक मुलगा दिसायला होता तो गोरागोरा, यथावकाश बारसे झाले, नांव ठेवले *'शिरा'.* ऊसाला आता काळजी वाटु लागली गुळाची, त्याच्या साठी मुलगी कशी अन् कुठे शोधायची ? ऊसाला होते माहीत, आपल्या मुलाला ना रुप ना रंग, सतत काळजी वाटायची, कसा जाईल काशीला हा संग. बर्‍याच मुली पाहील्या, कोणी त्याला पसंत करीना, काळजी वाटे ऊसाला रात्री झोप येईना. ऊसाला मित्र एक होता, नांव त्याचे तूप, त्याने प