Skip to main content

Posts

Showing posts from July 17, 2020

कृष्ण

*कृष्ण*,,, नावातील एकही अक्षर सरळ नसणारा हा देव,,, प्रत्येक शब्द हा जोडाक्षर,,, जितकं नांव कठीण तितका समजायला कठीण,, पण एकदा समजला की जीवनाचा अर्थ समजलाच म्हणून समजा,, जीवन म्हणजे काय हे समजून घ्यायचं असेल तर कृष्ण समजून घ्यावा,, दशावतारी भगवंताचा आठवा अवतार म्हणजे कृष्ण,, सातवा अवतार प्रभू राम,, *राम* ही अक्षरे सुद्धा सरळ अन त्याचं वागणं ही सरळ,,मर्यादेत,, म्हणून *मर्यादा पुरुषोत्तम*,,, रामाने आपल्या जीवनात कधीच कोणतीच मर्यादा ओलांडली नाही,, तरीही काही जणांनी त्याच्यात दोष शोधले,त्याच्यावर टीका केली,,, मग पुढच्या अवतारात प्रभू ने सर्व मर्यादा ओलांडल्या,, करा काय करायचं ते,,,😃😃😃 जीवनात आचरण रामसारखं असावं अन समजून कृष्ण घ्यावा,, कृष्ण आचरणात आणायच्या भानगडीत पडू नये,, कृष्ण म्हणजे *श्रीमदभगवद्गीता*,,, जीवनाचं सार,,, प्रभू रामाने जसा भर दुपारी मध्यानी अवतार घेतला तसा कृष्णाने पार मध्यरात्री अवतार घेतला,, जन्म झाल्याबरोबर त्याला ते ठिकाण सोडून गोकुळात जावं लागलं,, गोकुळात कृष्ण फक्त वयाच्या आठव्या वर्षापर्यंत राहिला,,, म्हणजे राधा राणी फक्त तोवर कृष्णासोबत होती, कृष्ण 8 वर्षाचा होऊ पर...