Skip to main content

Posts

Showing posts from February 23, 2017

स्त्री चा पदर

21/02/17, 6:37 PM - Messages you send to this group are now secured with end-to-end encryption. Tap for more info. 22/02/17, 11:44 AM - Sunita Deo Nichkaode SHS: 🍀🌾 स्त्रिचा पदर 🌾🍀 🍁 पदर काय जादुई शब्द आहे ... काना नाही, मात्रा नाही, वेलांटी नाही, अनुस्वार नाही. एक सरळ तीन अक्षरी शब्द. पण केवढं विश्‍व सामावलेलं आहे त्यात....!! किती अर्थ, किती महत्त्व... काय आहे हा पदर.......? साडी नेसणाऱ्या स्त्रीच्या खाद्यावर रुळणारा मीटर दीड मीटर लांबीचा भाग.......!! तो स्त्रीच्या लज्जेचं रक्षण तर करतोच, सगळ्यात महत्त्वाचं हे कामच त्याचं. पण, आणखी ही बरीच कर्तव्यं पार पाडत असतो. या पदराचा उपयोग स्त्री केव्हा, कसा अन्‌ कशासाठी करेल, ते सांगताच येत नाही. सौंदर्य खुलवण्यासाठी सुंदरसा पदर असलेली साडी निवडते. सण-समारंभात तर छान-छान पदरांची जणू स्पर्धाच लागलेली असते. सगळ्या जणींमध्ये चर्चाही तीच. .....!! लहान मूल आणि आईचा पदर, हे अजब नातं