Skip to main content

Posts

Showing posts from April 23, 2021

विडा किंवा तांबूल महत्व व संबंधित कथा.

विडा किंवा तांबूल महत्व व संबंधित कथा.... ---------------- १ )तांबूल प्रदान : देवीला विडा हा आत्यंतिक प्रिय आहे. विडा हा ही रजोगुणी आहे. त्रयोदशगुणी विडा तिला आत्यंतिक प्रिय आहे. जगाच्या कल्याणासाठी तिला सत्त्वगुणापेक्षाही रजोगुणाची आवश्यकता असते. म्हणून तिला रजोगुणी पदार्थ सेवन करण्याची आवड आहे. विडा, तिला प्रिय आहेत. -------------------------  २)तांबूल ऊर्फ विडा  ‘विडा’सुद्धा सर्व थरांतल्या लोकांमध्ये प्रिय आहे.   तांबूल म्हणजे कात , चुना, सुपारी इत्यादी पदार्थ घालून केलेला नागवेलीच्या पानाचा विडा. हा त्रयोदशगुणी असावा असा संकेत आहे. ते तेरा गुण म्हणजे तिखटसर, कडवट, उष्ण, मधुर, खारट व तुरट, वातहारक, कृमिनाशक, कफहारक, दुर्गंधी नाहीशी करणारा, मुखाची अशुध्दी नाहीशी करून मुखाला शोभा आणणारा, कामाग्नी उद्दीपीत करणारा...  ‘योगरत्नाकर’ ह्या ग्रंथातील एका श्लोकामध्ये हे सर्व वर्णन दिले आहे. त्यात विड्याचे घटक म्हणून पदार्थ दिले आहेत, नागवेलीची पाने, सुपारी, कात , चुना , कापूर , कस्तुरी, लवंग , जायफळ व तंबाखू . तंबाखूमुळे दंतरोग शमन होतो, तसेच कृमी व कंड नाश पावतात.   व...