Skip to main content

Posts

Showing posts from June 11, 2020

शौर्यदिन १०.६.२०२०

बाबासाहेब पुरंदरे बंगळूर मध्ये आले असताना त्यांनी एक किस्सा सांगितला. त्यांना कोणीतरी विचारले की जशी Tennison ची कविता आहे तशी एखादी कविता मराठीत आहे का? तर बाबासाहेबांनी कुसुमाग्रजांची ही कविता शेअर केली.  सैनिकाचे इमान वर्तवणाऱ्या या कविता. दोन्ही कवितांचा आशय अंगावर काटा आणणारा आहे. मराठी कविता आहे' वेडात मराठे वीर दौडले सात'  आज शौर्यदिन…   आजच्याच दिवशी इ.स १६६०मध्ये महाराजांचे ७ मराठे लढले , आदिल शहाच्या १५०० माणसांबरोबर…       त्या सात योद्धांची नावे.….  १) विसाजी बल्लाळ २) दीपोजी राउतराव ३) विट्ठल पिलाजी अत्रे ४) कृष्णाजी भास्कर ५) सिद्धि हिलाल ६) विठोजी शिंदे ७) आणि सरनौबत कुड्तोजी उर्फ़ प्रतापराव गुजर वेडात मराठे वीर दौडले सात..... "श्रुती धन्य जाहल्या, श्रवुनी अपुली वार्ता रण सोडूनी सेनासागर अमुचे पळता अबलाही घरोघर खऱ्या लाजतील आता भर दिवसा आम्हा, दिसू लागली रात" वेडात मराठे वीर दौडले सात… ॥ १ ॥ ते कठोर अक्षर एक एक त्यातील जाळीत चालले कणखर ताठर दील "माघारी वळणे नाही मराठी शील विसरला महाशय काय लावता जात!" वेडात मराठे वीर दौडले सात… ॥ २ ॥ वर भिवयी च