Skip to main content

Posts

Showing posts from July 21, 2020

बायको आणि जपानीज् मॅनेजमेंट सिस्टीम्स ..

*'बायको आणि जपानीज् मॅनेजमेंट सिस्टीम्स ..'*  *मला आठवतंय, शिक्षण संपवून नुकताच एका मोठ्या कंपनीत, मी कामाला लागलो होतो .. इंजिनिअर झालो म्हणजे खूप मोठा झालो आणि आपल्याला खूप काही कळतंय हा कसा गोड गैरसमज आहे हे थोड्याच दिवसात तिथल्या कामगारांनी दाखवून दिलं. कॉलेजमध्ये करतात अगदी तश्याच प्रकारच्या रॅगिंगला आम्हाला तोंड द्यावं लागलं. सगळेच कामगार कमीत कमी दहा बारा वर्षं नोकरी झालेले, प्रस्थापित .. त्यांच्या लीडरनी तर मला समोर बसवून अक्षयकुमार स्टाईल स्टोरी सांगितली, मागे एका इंजीनिरची कशी वाट लावली होती. पण तुम्ही त्यातले नाहीत वगैरे. थोडक्यात काय तर 'चड्डीत राहायचं' असा दम. सुरवातीच्या काळात बऱ्याच गमती जमती झाल्या. पण त्याच कामगारांनी नंतर हाताला धरून बरंच काही शिकवलं जे कुठल्याही शिक्षण पद्धतीत शिकवलं जातं नाही.  त्याबद्दल लिहीन नंतर कधीतरी. आता विषयांतर नको. तर सांगत काय होतो, आमचं एच आर डिपार्टमेंट वेगवेगळी ट्रेनिंग्स अरेंज करत असे. ज्याच्याकडे अगदी कमी महत्वाची कामं असतील किंवा जो जास्त उपद्रवकारक आहे अश्यांना ट्रेनिंगसाठी डिपार्टमेंटकडून पाठवलं जाई. थोडक्यात 'S...