Skip to main content

Posts

Showing posts from August 30, 2020

मंत्र पुष्पांजली हे भारताचे आदिम राष्ट्रगीत आहे,

*तुम्हाला माहित आहे का* मंत्र पुष्पांजली हे खरंतर भारताचे आदिम राष्ट्रगीत आहे, असे म्हणता येईल.. राजा मरुत याचे मारुतगण आपल्या राष्ट्रासाठी, त्याच्या स्थैर्यासाठी आणि भरभराटी साठी प्रार्थना करीत आहेत. यात एकूण चार कडवी आहेत. त्यातील प्रत्येक श्लोकाचा अर्थ येणेप्रमाणेः श्लोक – १ : यज्ञेन यज्ञं अयजन्त देवाः तानि धर्माणि प्रथामानि आसन् तेह नांक महिमानः सचन्तयत्र पूर्वे साध्याःसंति देवा: श्लोकाचा अर्थ –  *देवांनी यज्ञाच्या द्वारे यज्ञरुप प्रजापतीचे पूजन केले. यज्ञ आणि तत्सम उपासनेचे ते प्रारंभीचे धर्म विधी होते. जिथे पूर्वी देवता निवास (स्वर्गलोकी) करीत असत ते स्थान यज्ञाचरणाने प्राप्त करून साधक महानता (गौरव) प्राप्त करीते झाले.* श्लोक २- ओम राजाधिराजाय प्रसह्यसाहिने। मनोवयं वैश्रवणाय कुर्महे। स मे कामान् कामाकामाय मह्यं। कामेश्वरो वैश्रवणो ददातु कुबेराय वैश्रवणाय I महाराजाय नमःl श्लोकाचा अर्थ –  *आम्हाला सर्व काही (प्रसह्य) अनुकुल घडवून आणणाऱ्या राजाधिराज वैश्रवण कुबेराला आम्ही वंदन करीतो. तो कामेश्वर कुबेर कामनार्थी अशा मला (माझ्या सर्व कामनांची ) पूर्ति प्रदान करो.* श्लोक ३ (प्...