Skip to main content

Posts

Showing posts from October 8, 2020

रसवंती गृहांची नावे कानिफनाथ, नवनाथ’ का असतात?

*🔸रसवंती गृहांची नावे कानिफनाथ, नवनाथ’ का असतात?* *प्रत्येक गावातल्या स्टँडवर आठवडीबाजाराच्या ठिकाणी नवनाथ रसवन्तीगृह असतेच, कधी कधी कानिफनाथ रसवंतीगृह असं नाव असतं.* *आमच्या शेजारी एक जेरेशास्त्रीबुवा असतात. आमच्या चर्चेचा आवाज वाढला की ते आम्हाला शांत बसवायला येतात आणि स्वतःचं ज्ञान वाटून जातात तर हे जेरे आजोबा आम्हाला म्हणाले,* *ताजा ऊस हा हत्तीला फार आवडतो आणि कानिफनाथांची उत्पत्ती ही हत्तीच्या कानातून झाली आहे ! त्यामुळे ही खरे तर लोककथा आहे आणि भाव तिथे देव या न्यायाने कनिफनाथाना ऊस, रस, गूळ आवडतो. इतका सिंपल अर्थ आहे. दत्तसंप्रदायाची नाथसंप्रदाय ही शाखा आहे, त्यामुळे नवनाथ रसवंती, कानिफनाथ रसवंती ही नावे ठेवण्याचा प्रघात पडला असावा, आणि तो जनमानसात रुळला.* *कन्फ्युजन वाढत चाललं होतं. खरं खोट काहीच कळेना. अखेर आम्हाला आठवलं, आमच्या कॉलेजमध्ये आमचा एका दोस्त होता नवनाथ जगदाळे. त्याच्या वडीलांचं रसवंतीगृह होतं. त्यांच्या दुकानाचं नाव सुद्धा नवनाथ होत. सुरवातीला तर आम्हाला वाटायचं, आमच्या नवनाथच्या नावावरून त्याच्या बाबांनी रसवंतीचं नाव नवनाथ ठेवलय. आता लक्षात आलं तसं काही नाही. आत...