Skip to main content

Posts

Showing posts from October 26, 2020

डिंकात डिंक धावड्याचा डिंक !

डिंकात डिंक धावड्याचा डिंक ! सोबतच्या छायाचित्रात जमा केलेला फक्त धावडा वृक्षाचा डिंक आहे , ज्याला डोंगरी भाषेत धांबुडा असे उच्चारले जाते ! डिंक विविध वृक्षांपासून मिळत असला तरी सर्वात किंमती व मौल्यवान म्हणून धावडा डिंकाला महत्त्व आहे . शहरात किती जणांना याची ओळख व गुणवत्ता माहीत आहे हे प्रतिक्रिया वरुन लक्षात येईल. ग्रामीण भागात मात्र बाळंतीण अथवा अशक्त व्यक्तीला सुंठवडा किंवा डिंक लाडू बनवणे गरजेचे असते तेव्हा एकमेव पसंती ही धावडा डिंकालाच असते ! शहरी भागातच नव्हे तर आमच्या सारख्या आठवडी बाजार ठिकाणी सुद्धा धावडा डिंक सांगून इतर वृक्षांचा डिंक त्यात मिसळला जातो . साधारण डिंक हा कुठेही रस्त्याकडेने सुद्धा उपलब्ध होतो पण धावडा वृक्ष बहूत करुन सपाट मैदानापेक्षा डोंगर माथा , उतरण किंवा दऱ्यातच सापडतोइ त्यामुळे खूप भटकंती व कष्ट पडत असल्याने विकताना बराच महाग विकला जातो ! - रवींद्र मुंडे Bhir, Maharashtra.