Skip to main content

Posts

Showing posts from April 14, 2017

शांताबाईं शेळके यांच्या कविता अणि त्याची गाणी

*माज्या सारंगा, राजा सारंगा…* *लता मंगेशकर* कोळीगीतं गाताना आणि नंतर ऐकतानाही खूप मजा आली. किती वर्षं झाली या गीतांना… पण आजही ती कानावर पडली, तरी मन समुद्रात-कोळीवाड्यात भन्नाट फिरुन येतं. शांताबाईंनी लिहिलेली आणि बाळने (हृदयनाथ मंगेशकर) संगीत दिलेली तीन कोळीगीतं मी गायले आहे. ही कोळीगीतं गाणं हे माझ्यासाठी एक आव्हानच होतं. कारण ती गीतं लिहिताना शांताबाईंनी कोळी लहेजा शब्दांत नेमका पकडला होता, बाळने त्याच्या चालींमध्येही तो नेमका उतरवला होता, आता कसोटी माझी होती. तो लहजा गाताना मला नेमका पकडता आला नसता, तर सगळी मेहनत फुकट गेली असती... पण मला सांगायला आनंद होतो की, मी शांताबाई आणि बाळ दोघांनाही न्याय दिला. आजही जेव्हा मी ही गाणी ऐकते, तेव्हा माझ्याभोवती कोळीवाड्याचा, समुद्राचा आणि त्यात मासेमारीला गेलेल्या होड्यांचा माहौल उभा राहतो. मला खरंच कौतुक वाटतं शांताबाईंचं की त्यांनी कोळीवाड्यातली ही शब्दकळा कशी अचूक साध्य केली असेल? पण शेवटी शांताबाईच त्या, भाषाप्रभू होत्या. संस्कृत-मराठी भाषा त्यांना वश होत्या. मनातली एखादी भावना-विचार सांगायची खोटी, दुसऱ्या क्षणाला त्यांनी अलवार गीत पेश केल...

एका तळ्यात होती बदके पिल्ले सुरेख Mast Vidamban!

मूळ गाणे --- एका तळ्यात होती बदके पिल्ले सुरेख  Mast Vidamban! enjoy!! 'ए'च्या वर्गात होती, फडके निलू सुरेख  होते तरूण भुंगे, मागे तिच्याच कैक ...  कोणी तिला बघोनी, स्वप्नामध्येच दंगे  नि:श्वास प्रेमिकांचा, वार्‍यावरी तरंगे ती हासताच होती, घायाळ ही अनेक ...  भुंग्यांस दु:ख भारी, बोले न ती कुणाशी  कोणा न ती विचारी, रडती खुळे उपाशी  चेहेरे उदास त्यांचे, हसती बघून लोक ...  एके दिनी परंतू, भुंग्यास त्या कळाले  ते फूल इंग्रजीच्या, गुरुजींसवे पळाले  हैराण सुन्न सारे, करती अजून शोक .. 😅😅😂😂😂. कमाल.. एक नंबर As received on whatsapp.