मूळ गाणे --- एका तळ्यात होती बदके पिल्ले सुरेख
Mast Vidamban! enjoy!!
'ए'च्या वर्गात होती, फडके निलू सुरेख
होते तरूण भुंगे, मागे तिच्याच कैक ...
कोणी तिला बघोनी, स्वप्नामध्येच दंगे
नि:श्वास प्रेमिकांचा, वार्यावरी तरंगे
ती हासताच होती, घायाळ ही अनेक ...
भुंग्यांस दु:ख भारी, बोले न ती कुणाशी
कोणा न ती विचारी, रडती खुळे उपाशी
चेहेरे उदास त्यांचे, हसती बघून लोक ...
एके दिनी परंतू, भुंग्यास त्या कळाले
ते फूल इंग्रजीच्या, गुरुजींसवे पळाले
हैराण सुन्न सारे, करती अजून शोक ..
😅😅😂😂😂.
कमाल.. एक नंबर
As received on whatsapp.
Comments
Post a Comment