Skip to main content

Posts

Showing posts from April 5, 2017

आमरस

*आमरस* होळी झाली की पाडव्याचे आगमन होऊ लागते...आणि त्याच वेळी वेध लागतात आंब्याचे...अर्थात आमरसाचे... खर तर आमरसाची सुरुवात अक्षयतृतीयेपासून करतात पण तो पर्यंत काही कळ निघत नाही.... जीभ आणि पोट अक्षरशः बंड करू पहात... इतक्या वर्षात कोकणात बऱ्याचश्या आढी आणि वाड्यावर म्हाळसाच्या खुप ओळखी झालेल्या असल्याकारणाने तिकडून फोन/निरोप यायला सुरुवात होते.. म्हाळसाच्या बऱ्याच फोनाफोनी नंतर अगदी अस्सल आणि निवडलेल्या रसभरीत हापूस आंब्याची सिझनची पहिली पेटी घरात येते आणि पाडव्यापासून सुरु होतो आमरसाचा एक भव्यदिव्य रसभरीत सोहळा व उभे होते पुढील दोन महिन्याचे आंब्याचे अर्थात आमरसाचे महानाट्य... पेटीतले पहिले दोन आंबे देवाला प्रसाद म्हणून ठेवले की अगदी आतुरतेने वाट पहायची पाडव्याची... त्या दिवशी आमरसाचा श्रीगणेशा होतो.. त्या आधीच दोन दिवस घरात आंब्याच्या वासाचा घमघमाट असतो...बाहेरुन घरात प्रवेश केल्यावर या वासाने मन प्रफ्फुलीत होते...अश्या या वासाचे वैभव छाती फुगवून मिरवायला जाम आनंद होतो... मग येतो पाडवा...या दिवशी पहिला आमरस पुरीचा बेत... अक्षरशः एखाद्या युद्धाला जाण्याच्या आवेशात त्यावेळी आमरसावर तु...