Skip to main content

Posts

Showing posts from July 26, 2020

माझे माहेर डोंबिवली

माझे माहेर डोंबिवली.  किती मस्त लिहिलंय....👌👌👌 माझ्या आठवणीतील डोंबिवली डोंबिवली एक निद्रिस्त खेडं होतं. येथे रेल्वे येताच गाव होण्याची प्रक्रिया सुरु झाली. त्या काळात दोनच प्लॅटफॉर्म होते. असं सांगतात कि ते आजच्या सारखे उंच नव्हते. जमिनीवरच उतरावे लागे. तेव्हा वस्ती ही फार नव्हती तर गर्दी कुठून येणार? येथल्या भूमिपुत्रांची संख्याही कमी. तेव्हा तरी त्यांना ट्रेनची गरज भासत नव्हती. रेल्वे येताच त्यांच्या कर्मचाऱ्यांसाठी रेल्वेने वसाहतीसाठी जागा दिली. तीच आज अवशेष स्वरुपात असलेले बारा बंगले आणि बावनचाळी. एके काळी विजेच्या चमचमाट्यानं चमकत होती. इंग्रजांनी ह्या गावाला डिमॉली असं नाव दिल. पुढे डिमॉलीच डोंबिवली झालं. एक महत्वाची आठवण म्हणजे प्लॅटफॉर्म नंबर एकच्या पलीकडे म्हणजे डोंबिवलीच्या पश्चिमेकडे एक तळं होतं. त्यात घन:श्याम गुप्ते यांची एक होडी असायची. हे गुप्ते पुढे डोंबिवलीचे सरपंच झाले. ह्या गुप्त्यांनीच दिल्लीपर्यंत स.गो. बर्वे यांची मदत घेऊन बदलापूरहून नळाचं पाणी आणलं. डोंबिवली त्याकाळात किती निवांत होती हे ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त विंदा करंदीकरांनी एके ठिकाणी सांगितलं आहे....

जिवती

जिवती... #जिवतीच्या_प्रतिमेचा_भावार्थ    मानवाला अनादी काळापासून घडणाऱ्या घटनांचं कौतुक आणि त्याबद्दल उत्सुकता आहे. याच उत्सुकतेमधून तो नवनवीन आविष्कार आणि गूढ घटना यांबद्दल आदरभाव दाखवत आलेला आहे. या आदराचं रूपांतर त्या अनाकलनीय गूढाचा सत्कार व पूजन करण्यात झालं. यातूनच ते गूढ पिढ्यांपिढ्या पुजल्या जाऊ लागलं . असाच एक गूढ दार पिढ्यांनी पुजलं ते 'जिवती पूजन' या रूपात.  कोण ही जिवती? हिच्या पूजनाचा हेतू काय? जिवती प्रतिमेचा नेमका भावार्थ काय? असे बरेच प्रश्न मनात रेंगाळत होते. यासंदर्भात मला जे काही कळलं ते  आपल्या पर्यंत पोहोचवण्यासाठी हा लेखन प्रपंच.  आषाढ महिन्याच्या अमावस्येला हे दीपपूजन केलं जातं आणि याच दिवशी जरा-जिवंतिका पूजन सुद्धा करतात. दिवा हे ज्ञानाचं, वृधिंगतेच प्रतीक आहे. अज्ञानाचा नाश करून ज्ञानाकडे जाणाऱ्या मार्गाचा मुख्य आधार आहे दीप. तुम्ही एक दिवा उजळा त्यावरून तुम्ही हजारो दिवे उजळू शकता त्यामुळेच याला वंश वृद्धीचं प्रतीक मानतात. या प्रतीकाचं पूजन म्हणजेच आजचं  दीपपूजन. आजची दुसरी पूज्य देवता म्हणजे जिवती. जिवतीची प्रतिमेच्या रूपात पूजा...