Skip to main content

Posts

Showing posts from July 17, 2017

अन्नपूर्णा

 *अन्नपूर्णा* माणसाच्या हातून कळत नकळत काही चुका होत असतात, पण त्यांचे परिणाम मात्र त्रासदायक असतात. घरोघरी आढळणारी एक मोठी चूक म्हणजे अन्नाचा अपमान.  एखादा माणूस जेवायला बसलेला असतो तेवढय़ात घरात किरकिर सुरू होते. पती-पत्नी, मुले किंवा कुणीतरी पाहुण्यापैकी अचानक नको ते विषय काढतात. शब्दाला शब्द वाढत जातात. भांडणे सुरू होतात व कुणीतरी रागाने जेवणावरून उठून जातो. अन्न तसेच रहाते. अन्नाचा म्हणजे अन्नपूर्णेचा अपमान होतो. नंतर घराण्याला उतरती कळा लागते. घरचा कर्ता पुरुष अथवा स्त्री जेवायला बसले असताना त्यांना घरातील कोणत्याही अडचणी सांगू नका. त्यांना शांतपणाने चार घास खाऊ द्या. शत्रू जरी काही खातपीत असेल, जेवत असेल तर त्याला सुखाने खाऊ द्या. काहीही बोलू नका. अन्नावरून रागाने उठणारी व्यक्ती अथवा त्याला तसे करण्यास भाग पाडणारा कुणीही असो, दोघांनाही अन्नाचा शाप लागतो. गरिबीमुळे काहीजण भाकरी, ब्रेड, वडे, सामोसे अथवा लाडू वगैरे चोरून खाण्याचा प्रयत्न करतात व शेवटी जमावाकडून मारही खातात. मांजरे व तत्सम प्राणी काही वेळा चोरून दूर पितात म्हणून काहीजण त्यांना मारतात. अथवा हुसकावून लावतात. च...