Skip to main content

Posts

Showing posts from April 1, 2017

चैत्र गौर....

26/03/17, 10:36 PM - Messages you send to this group are now secured with end-to-end encryption. Tap for more info. 31/03/17, 1:09 PM - Harshada Kolwadkar Marathe SHS: चैत्रगौर तृतीयेला बसवतात.वसंतातल्या उत्सवासाठी आपली माहेरवाशीण देवी।गौरी रूपात महिनाभर आपल्या माहेरात वास्तव्य करते.म्हणून तिचं कोडकौतुक करण्यासाठी हळदीकुंकू करण्याची पद्धत असावी.चैत्र आला की नवचैतन्य ,नववर्षाचे स्वागत ,कोकीळकूजन आणि नवपालवीने वातावरणात उत्साह भरून असतोच.त्यात गौरीच्या आगमनाने अानंद अधिकच वाढतो.तृतियेला देवीवर पंचामृत अभिषेक करून वेगळी बसवतात. थंडाव्यासाठी कैरी पाण्याच्या भांड्यावर आंब्याची पाने ठेवून देवीजवळ ठेवतात.हळदीकुंकवा साठीथंडगार पन्हे,करंज्या , कैरीची डाळ,दडपे पोहे हे पदार्थ केले जातात.कलिंगड खरबूज ही थंडावा देणारी फळेही देवासमोर ठेवतात.मंगळवारी/ शुक्रवारी हळदीकुंकू करून हरबरयाने सवाष्णींची ओटी भरतात.रोज चैत्रांगणाची रांगोळी काढतात. मी तोतापुरी आंब्याचे पोपट करते.हिरवाईत देवीला बसवायला मला आवडतं.झोपाळ्यात देवी हिंदोळे घेते.हळदीकुंकू झाल्यावर देवी पुन्हा देवघरात बसते.देवीला नैवेद्य करतात.अक्षय्य