Skip to main content

Posts

Showing posts from July 10, 2020

आठवणितले दिवस..

आठवणितले दिवस....! पाचव्या इयत्तेपर्यंत पाटीवरची पेन्सिल जिभेने चाटत *कॅल्शियमची* कमतरता भरून काढायची आमची जन्मजात सवय होती.  अभ्यासाचं टेन्शन आम्ही पेन्सिलीचं मागचं टोक *चावून* झेललं होतं  पुस्तकामध्ये *झाडाची पानं* आणि *मोरपिस* ठेवून आम्ही हुशार होऊ शकतो असा आमचा *दृढ* विश्वास होता. कापडाच्या पिशवीत पुस्तकं आणि वह्या रचण्याचा *शिरस्ता* हे आमचं एक निर्मितीकौशल्य होतं दरवर्षी जेव्हा नव्या इयेत्तेचं दप्तर भरायचो त्याआधी पुस्तकं आणि वह्यांना कव्हर्स घालणे हा आमच्या जीवनातला एक *वार्षिक उत्सव* असायचा. आई वडिलांना आमच्या शिक्षणाची फारशी *फिकीर* नव्हती आणि ना हि आमचे शिक्षण त्यांच्यावर फारसा *बोजा* होते. वर्षानुवर्षं आमच्या आईवडिलांची पावलं कधी आमच्या *शाळेकडे* वळत नव्हती. एका मित्राला सायकलच्या पुढच्या *दांड्यावर* व दुसऱ्याला मागच्या *carrier* वर बसवून आम्ही रस्तोरस्ती किती फिरलो हे आता आठवतही नाही. बस्सं!......काही *धूसर* आठवणी उरल्यात इतकंच.......!! शाळेत मार खाताना आणि पायांचे अंगठे धरुन उभं राहताना आमचा *'ईगो'* कधीही आडवा येत नव्हता, खरं तर आम्हाला *'ईगो'* काय असतो हेच ...