Skip to main content

Posts

Showing posts from July 24, 2021

पावसाच्या नक्षत्रांचे वर्णन

गावाकडे पावसाच्या नक्षत्रांचे बोलकं वर्णन केलं जातं. त्याच भाषेत सांगायचं झालं तर तरणा पाऊस पडून गेलाय, त्याच्या पाठोपाठ म्हाताराही पडून गेला आहे. आता सासूचा पाऊस पडेल मग सुनेचा पाऊस पडेल. हे असं का म्हटलं गेलंय याचे बहुतेक निष्कर्ष खुमासदार आहेत.  बहुधा प्रत्येक पाऊसनक्षत्रासाठी गावाकडे स्वतंत्र म्हणी आहेत.  पडतील स्वाती तर पिकतील माणिक मोती (स्वाती नक्षत्रातला पाऊस पिकाला खर्‍या अर्थाने उभारी देतो, रूपरंग देतो. त्यामुळे या नक्षत्रात पाऊस झाला तर खर्‍या अर्थाने माणिक मोती पिकतात) पडतील चित्रा तर भात खाईना कुत्रा (चित्रा नक्षत्रातला पाऊस बिनभरवशाचा असतो. पडला तर इतका पाऊस पडतो की तो काहीच शिल्लक ठेवत नाही, अगदी वाडग्यात काढून ठेवलेलं उष्टावण असो की ताजं जेवण असो ते एकतर सादळून तरी जातं नाहीतर बेचव तरी होऊन जातं. म्हणून मग त्याची चव जाते. मग त्याचं वर्णन भात खाईना कुत्रा अशा शेलक्या शब्दात आलंय)           ,  पडतील आर्द्रा तर झडतील गडदरा (आर्द्रा नक्षत्रातला पाऊस बरसला तर गडकोटांच्या तटबंदी ढासळतील. काही खेड्यात गरदाडा असा ही शब्द आढळतो. त्याचा अर्थ...