Skip to main content

Posts

Showing posts from August 30, 2017

गौराई

#गौराई..   खुप जवळची वाटते मला ही. तुमच्या माझ्यासारखी. आपल्याला नवरा म्हणून कोण हवा याबद्दल स्वतःच ठाम मत असणारी आणि  आई वडिलांना ते तितक्याच ठामपणे सांगणारी हिमानी.   नव-यावर जीवापाड प्रेम करणारी पण तरीही त्याच्याशी भांडणारी पार्वती.     दोन्ही मुलांना त्यांच्या त्यांच्या कार्यपूर्तीसाठी आपल्यापासून दूर जाऊ देणारी गौराई.    संतापि पण भोळ्या व प्रेमळ नव-याला त्याच्या सर्व गोतावळ्यासह सांभाळणारी शिवप्रिया.    स्वतःच्या संसारावर..पतिवर संकट आल्यावर रणरागिणी बनणारी दुर्गा.    माहेरी फक्त तीन दिवस येणारी. भाजी भाकरी खाणारी. नदीतून; शेतातून;वनराईतून बागडणारी सगळ्यांकडून लाड करून घेणारी आणि पुन्हा आपल्या संसाराकडे परतणारी गौरी.    हि सगळी तुमची माझीच तर रुप आहेत. म्हणूनच ती आपली सखी आहे. माहेरवाशीण आहे. लेक आहे. मंगळागौर आहे.गौराई आहे. आपल्या सगळ्या व्रतांमध्ये..कहाण्यांमध्ये...तीच तर भरुन राहिली आहे. तुमची माझी गौराई. -Shubhangi