Skip to main content

Posts

Showing posts from June 24, 2020

नर्मदा परिक्रमा ~ माताराम वंदना फडके

माताराम वंदना फडके   ( परिक्रमा करण्यार्‍या स्त्रीला आदराने माताराम असं संबोधलं जातं.) वंदना फडके-वय वर्षं ५२. नुकत्याच ३१०० किलोमीटर चालून नर्मदा परिक्रमा करून आल्या. ११ नोव्हेंबर २०१९ या दिवशी सुरूवात करून १२६ दिवसात त्यांनी ही परिक्रमा विनाव्यत्यय पार पाडली. नुसती पार पाडली एवढंच नव्हे तर अतिशय मजेत पार पाडली इतकी की परतत्ताना त्यांना हुरहूर वाटत होती की उद्यापासून या मजेला आपण मुकणार आहोत.  नर्मदापरिक्रमेतल्या त्यांच्या अनुभवांसाठी हा वार्तालाप. प्रश्न नर्मदापरिक्रमेला जावं असं तुम्हाला का आणि कधी वाटलं? उत्तरः तसं गेली दहा वर्षं माझ्या मनात हा विचार घोळत होता, प्रतिभा चितळे यांचे परिक्रमेचे अनुभव मी यू ट्युबवर पाहत असे आणि आपणही असं का करू नये असं मला वाटत असे. अखेरीस आपल्या सांसारिक जबाबदार्‍या बर्‍यापैकी पार पाडल्यानंतर हे धाडस करावं असं सर्वानुमते ठरलं. मग मुलाचं लग्न झालं, यजमानांनी चार महिने स्वावलंबनाची तयारी दर्शवली आणि मी ठरवलं की आता हीच ती वेळ आपला मनोदय पुरा करण्याची. मग त्या दृष्टीने चौकशी सुरू केली. पाच-सात जणींचा ग्रुप जमला-सगळ्या मला अनोळखी होत्या-संपर...