Skip to main content

Posts

Showing posts from May 2, 2017

“मामाचं गाव” “आजोळ” अशी नावं रिसॉर्टला दिली ..

"मामाचं गाव" "आजोळ" अशी नावं रिसॉर्टला दिली म्हणजे एक विशिष्ट, टिपीकल ग्राहकवर्ग हुकमी आकर्षित होतोच होतो...कोकण किंवा विदर्भ-खानदेशातील गावं सोडून जमाना झालेली, मुंबई-पुण्यात सेटल झालेली, वीकऐंडला हाफपॅन्ट घालून फिरणारी मंडळी...आपल्या मुलांना आपल्या बालपणीच्या आठवणी सांगून त्या अनुभवाच्या जवळपास नेण्याचा आटोकाट प्रयत्न करणारी, तुटलेल्या नात्यांचे धागे जोडण्यासाठी धडपडणारी अशी ही निरागस मंडळी असतात...अशा रिसॉर्टवर जाण्यासाठी हजारो रुपये भरुन बुकींग करतात... तिथे गेल्यावर शेणाने सारवलेल्या जमिनीवर बसतात, धाप लागली तरी विहीरीचं पाणी शेंदतात...श्वास वरखाली झाला तरी "तुला सांगतो अश्विनी, आमच्या लहानपणी माणगावला मामाकडे गेलो की मी दहा दहा बादल्या पाणी काढायचो विहीरीतून" असं सांगत असतो. चि.अश्विनी मात्र How to fetch water from well? चा व्हिडीओ युट्यूबवर शोधत असते. सकाळी मऊभात-तूप-मेतकुट खाताना त्याला त्याची अलिबागची इंदूमावशी आठवत असते. तिच्या हातच्या मऊभात मेतकुटाची चव तो इथे शोधण्याचा एक निष्फळ प्रयत्न करुन बघतो..ब्रेकफास्टला पास्ता नसल्याने किंचित नाराज झालेल